फरकाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:46+5:302021-09-21T04:11:46+5:30

बारामती: बारामती नगर पालिकेतील प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या फरकाची वीस टक्के रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी ...

Of difference | फरकाची

फरकाची

Next

बारामती: बारामती नगर पालिकेतील प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या फरकाची वीस टक्के रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

शिक्षक संघाचे सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार बारामती नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे शिक्षक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या वेळी वरील मागणी करण्यात आली. याप्रसंगी सुरेंद्र गायकवाड, अविनाश कवडे व विकास कंकाळ उपस्थित होते.

बारामती नगरपरिषद प्राथमिक शिक्षकांना ऑगस्ट २०१९ पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन सुरू झाले आहे. परंतु जानेवारी २०१६ पासून देय असणारी भविष्य निर्वाह निधीत जमा होणारी ३६ महिन्यांची फरकाची रक्कम व सात महिन्यांची रोखीने मिळालेल्या फरकाची ऐंशी टक्के रक्कम राज्य शासनाने दिली आहे. परंतु नगर परिषदेकडील देय असणारी वीस टक्के रक्कम अद्याप शिक्षकांना मिळालेली नाही. ती त्वरित मिळावी. तसेच हद्दवाढ झालेल्या भागातील जिल्हा परिषदेच्या नऊ शाळा कार्यरत शिक्षकांसह लवकरात लवकर नगरपालिकेत सामावून घ्याव्यात, अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली.

शिक्षक संघाने केलेल्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्याधिकारी रोकडे यांनी दिले. बारामती नगर परिषदेच्या सर्व शाळांना मानांकन प्राप्त व्हावे, याकरिता शिक्षकांनी विशेष मोहीम राबवावी असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात नगरपरिषद प्रशासनाने सर्व शिक्षकांसमवेत सहविचार सभेचे आयोजन करावे, अशी मागणी अविनाश कवडे व विकास कंकाळ यांनी केली आहे.

Web Title: Of difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.