कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मतभेद
By admin | Published: December 18, 2015 02:30 AM2015-12-18T02:30:39+5:302015-12-18T02:30:39+5:30
कात्रज-कोंढवा रस्ता डिफर्ड पेमेंटने करण्याच्या विषयावरून स्थायी समितीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मंजूर झालेल्या या विषयाचा फेरविचार करण्याचे पत्र समितीमधील भाजपा-सेनेच्या
पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता डिफर्ड पेमेंटने करण्याच्या विषयावरून स्थायी समितीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मंजूर झालेल्या या विषयाचा फेरविचार करण्याचे पत्र समितीमधील भाजपा-सेनेच्या सदस्यांकडून दिले जाणार आहे.
समितीमधील भाजपाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर, श्रीकांत जगताप, तसेच सेनेच्या सदस्या दीपाली ओसवाल यांनीच ही माहिती दिली. डिफर्ड पेमेंट म्हणजे रस्त्याच्या खर्च ठेकेदाराला टप्प्याटप्प्याने अदा करणे. मोठ्या रकमेची एकदम गुंतवणूक करता येत नसली की अशी पद्धत वापरण्यात येते. यात ठेकेदाराकडून बिलाचे हप्ते ठरवून घेतले जातात. वरवर पाहता यात पालिकेचा फायदा दिसत असला, तरी ठेकेदार हप्ता ठरवून घेताना व्याजाचाही विचार करीत असल्यामुळे पालिकेला जास्त पैसे अदा करावे लागतात.
कात्रज-कोंढवा रस्ता असा मोठ्या रकमेचा असला, तरी हा विषय प्रशासनाकडून आलेला नाही, तरीही तो स्थायी समितीत मंजूर केला गेला. त्यामुळे त्याचा फेरविचार करावा, असे पत्र देणार असल्याचे जगताप, शिळीमकर व ओसवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)