स्वायत्त महाविद्यालयांना नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी येतात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:05+5:302021-01-16T04:15:05+5:30
महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त सांगता समारंभाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या ...
महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त सांगता समारंभाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह प्रा.श्यामकांत देशमुख, प्रा.सुरेश तोडकर आदी उपस्थित होते.
झुंझारराव म्हणाले,
आमच्या महाविद्यालयाने एमएससी अनिमेशन, बी-व्होक अनिमेटर, लँडस्केपिंग असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु परवानगी मिळत नसल्याने अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एक वर्ष उशीर होत आहे.
एकबोटे म्हणाल्या,
सद्यस्थितीत महाविद्यालयांना स्वायत्तता मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. यूजीसीच्या नियमानुसार महाविद्यालयांना नवे अभ्यासक्रम सुरू करता येतात. त्यासाठी अभ्यासक्रमाची माहिती विद्यापीठामार्फत राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात येते, परंतु विद्यापीठ आणि विभागाकडून कार्यवाही वेळेत होत नाही.
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सांगता समारंभ
शिवाजीनगर येथील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे आदी उपस्थित राहणार आहेत, असे श्यामकांत देशमुख यांनी सांगितले.