अधिकारीच जागेवर नसल्याने अडचण
By admin | Published: January 11, 2017 02:23 AM2017-01-11T02:23:35+5:302017-01-11T02:23:35+5:30
शिक्षण विभागात गेल्यावर अधिकारी भेटतच नाहीत, अशा तक्रारी नेहमीच्याच आहेत. मात्र त्या खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कानावर पडल्याने त्यांनी
पुणे : शिक्षण विभागात गेल्यावर अधिकारी भेटतच नाहीत, अशा तक्रारी नेहमीच्याच आहेत. मात्र त्या खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कानावर पडल्याने त्यांनी सोमवारी माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवून अधिकारी असतात कुठे, असे विचारल्यानंतर आमच्याकडेही तकारी आल्या असून पाच विस्तार अधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना नोटिसा काढल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मान्यता न घेता दौरे काढणे, सोमवार आणि शुक्रवार कार्यालय मुख्यालयात थांबणे बंधनकारक असताना परस्पर बाहेर जाणे, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. या तक्रारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर शिक्षण अधिकारी हरुण आत्तार यांनी सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस मुख्यालयात थांबण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही हे प्रकार सुरूच होते.
यामुळे उपशिक्षणाधिकारी धनाजी बुट्टे, संध्या गायकवाड, बाळासाहेब राक्षे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मोतीलाल बेंद्रे, भाऊ कारेकर, नीलेश धानापुणे आणि मुसाळे यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर न राहण्याने, जिल्ह्यात दीड हजारापेक्षा जास्त माध्यमिक शाळा आहेत त्यांची दैनंदिन कामे आणि अडचणींसंदर्भात असणारी कामे प्रलंबित राहत आहेत.
४या संदर्भात पत्रकारांशी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सर्वच अधिकाऱ्यांना सोमवार व शुक्रवारी कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे.
४या दिवशी जिल्ह्यातून लोक आपली कामे घेऊन येतात,
पण त्यांना अधिकारी नसल्याने परत जावे लागते. यापुढे असे प्रकार आढळल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावर ठोस भूमिका घ्यावी. याला लगाम घालणे गरजेचे आहे.