'' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ''चा नारायणपूरात जयघोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 08:29 PM2019-07-16T20:29:32+5:302019-07-16T20:32:29+5:30
श्री. क्षेत्र नारायणपुर (ता.पुरंदर ) येथील प्रसिध्द दत्त मंदीरात आज गुरूपौर्णिमेनिमित्त फुलांची मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती.
पुणे : श्री. क्षेत्र नारायणपुर (ता.पुरंदर ) येथील प्रसिध्द दत्त मंदीरात आज गुरूपौर्णिमेनिमित्त फुलांची मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती. विद्यूत रोषणाई ने अवघा परिसर लखलखून निघाला होता.यावेळी भाविकांमधून चार कोपऱ्यातून चार भाविकांना पादुका पूजनाचा मान मिळाला.गुरूपौर्णिमेनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याकरिता पहाटे पासून महाराष्ट्रातून मध्यप्रदेश, तामीळनाडू, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातुन आलेले हजारो भाविक उपस्थितीत होते.
नारायण महाराज यांच्या ऊपस्थितीत बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते गुरु व्यास महर्षी यांच्या पादुकांचे पुजन करण्यांत आले. गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यांत आली. पहाटे ४ ते ६ या काळात पादुका व मुर्तींना रुद्राभिषेक करण्यांत आला. त्यानंतर ८.३० ते ९ आरती,९.३० ते ११:३० होमहवन, दुपारी१२ ते १ गुरूपुजन, दुपारी१ते १: ३० बोधामृत, आशिर्वाद, प्रवचन . त्यानंतर १.३० ते २ महाआरती, दुपारी २ ते ४ महाप्रसाद सायंकाळी ५ ते ७ गुरूपुजन शिष्यांसाठी नारायण महाराज यांचे शिष्य यांच्या वतीने नारायण महाराज यांचे गुरु पुजन व दर्शन सोहळा पार पडला. रात्रौ ९.३० ते १० वाजता महाआरती झाली.१०ते १२.३० पालखी प्रदक्षिणा व आरती , रात्री १.३० ते ४.३० ग्रहणाचे होमहवन पहाटे ५.३० ला पुर्णाहुतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी पंढरपूर देवस्थानचे माजी अध्यक्ष शशिकांत पागे, माजी आमदार ऊल्हास पवार, माजी खासदार अशोक मोहोळ, बाळासाहेब सोळस्कर, रामभाऊ बोरकर, भरतनाना क्षीरसागर उपस्थित होते. भाविकांनी '' दिगंबरा दिगंबरा '' च्या जयघोष केला. या जयघोषाने हा परिसर दुमदुमला.