दिघीच्या प्रतिबंधित क्षेत्रात मुक्त वावर
By admin | Published: April 24, 2017 05:16 AM2017-04-24T05:16:17+5:302017-04-24T05:19:15+5:30
येथील मॅगझिन चौकात असलेल्या संरक्षण विभागाच्या मॅगझिन डेपो (दारूगोळा कोठार) व दिघी डोंगराजवळील दारूगोळा
दिघी : येथील मॅगझिन चौकात असलेल्या संरक्षण विभागाच्या मॅगझिन डेपो (दारूगोळा कोठार) व दिघी डोंगराजवळील दारूगोळा चाचणीचा मोकळा परिसर नागरीकांसाठी संरक्षण विभागाने प्रतिबंधित केला आहे.
मात्र मागील काही दिवसात दिघी डोंगरानजीक सापडलेले सात जिवंत बॉम्ब सदृश वस्तू यामुळे सामान्य नागरीकांसह संरक्षण विभागाच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता समोर आला आहे.
खडकी अॅम्युनिशन फॅक्टरीत बनलेल्या दारूगोळ्याची चाचणी परिक्षा दिघी डोंगरालगत असलेल्या मैदानात घेतली जाते. चाचणीच्यावेळी सर्व परिसर मोकळा करून निर्मनुष्य केला जातो. तसेच जवळचं या परिसरात असलेल्या दारूगोळा कोठाराच्या सुरक्षेबाबतची काळजी घेऊन हा परिसर प्रतिबंधित क्षेञ घोषित करण्यात आले आहे. त्याकरीता संरक्षण विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात संरक्षक सिमा भिंती सुध्दा बांधलेल्या आहेत.
मात्र या बांधलेल्या सिमा भिंतीलाच प्रतिबंधित क्षेञात प्रवेश करण्यासाठी अनेक वाटा निर्माण झाल्या आहेत. ह्या निर्माण झालेल्या वाटा नागरीकांनी केल्या की संरक्षण विभागाने सोडल्या आहेत हे मात्र अनुत्तरीत असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने
संरक्षण विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आता सामान्य नागरीकांचा होणारा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. याच दिघी डोंगराच्या पायवाटेच्या वाटेने धानोरी गावाकडे जाण्याची
वाट आहे. विश्रांतवाडी मार्गे धानोरी गावात जाण्याचा सरळ मार्ग असतांना अनेक पायी व दोन चाकी वाहनधारक या प्रतिबंधित क्षेत्रामधून धानोरीचा मार्ग वापरत आहेत. नुकतेचं दोन दिवसांपूर्वी झालेल्या दारूगोळा चाचणी परिक्षेच्या वेळी संरक्षण विभागाने सिमाभिंतीच्या सर्व वाटेवर खोल खड्डे खोदून नागरीकांची वहिवाट बंद केली आहे. (वार्ताहर)