श्रीनगरमधील विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल चित्रपट निर्मितीचे धडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:53 PM2018-03-29T13:53:10+5:302018-03-29T13:53:10+5:30

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने डिजिटल फिल्म प्रॉडक्शनचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

digital film production Lessons for Shrinagar students | श्रीनगरमधील विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल चित्रपट निर्मितीचे धडे  

श्रीनगरमधील विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल चित्रपट निर्मितीचे धडे  

Next
ठळक मुद्देएफटीआयआयच्या लघु अभ्यासक्रमात डिजिटल फिल्म प्रॉडक्शन या नवीन विषयाचा समावेश

पुणे : चित्रपटांच्या शुटींगसाठी नंदनवन असलेले ठिकाण म्हणजे श्रीनगर. या भागात अनेक रोमँटिक चित्रपटांची शुटिंग श्रीनगरवासियांनी जवळून अनुभवली. मात्र,कधी त्याचा एक घटक होण्याची संधी मिळाली नाही. परंतु, आता डिजिटल चित्रपट निर्मितीचे धडेच काश्मिरी व्हॅलीमधील विद्यार्थ्यांना गिरवता येणार असून भविष्यात या निर्मिती प्रक्रियेत त्यांना प्रत्यक्ष सहभागी देखील होता येणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने डिजिटल फिल्म प्रॉडक्शनचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन जम्मू-काश्मीर माहिती विभागाचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी मुनीर-उल इस्लाम आणि एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभ्यासक्रमाच्या संचालिका जयश्री कानल, सहायक संचालक ए. एस. कानल आणि राष्ट्रीय समन्वयक संदीप सहारे उपस्थित होते. या अभ्यासक्रमासाठी १९ ते ४१ वर्षे वयोगटातील श्रीनगर, बडगम आणि कारगिल भागातील १५ जणांनी प्रवेश घेतला आहे. त्यात महिलांचासुध्दा समावेश आहे.एफटीआयआयच्या लघु अभ्यासक्रमात डिजिटल फिल्म प्रॉडक्शन या नवीन विषयाचा समावेश करण्यात आला आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन मधील ‘कौशल्याधारित भारत ’या उपक्रमांतर्गत हे लघुअभ्यासक्रम देशाच्या विविध भागात सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये एफटीआयआयने चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम राबविला होता. हुशारी, दृष्टीकोन आणि समजूतदारपणा याची काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये कमतरता नाही. कौशल्याधारित चित्रपट अभ्यासक्रम चित्रपटांविषयीची अभिव्यक्ती सशक्त करण्यास कारणीभूत ठरतात असे  कँथोला यांनी सांगितले. जयश्री कानल म्हणाल्या , डिजिटल चित्रपट निर्मिती प्रक्रियेत चर्चा आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून सहभाग वाढविणे हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागचा हेतू आहे.  

Web Title: digital film production Lessons for Shrinagar students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.