पुण्यात डिजिटल साहित्य संमेलन

By admin | Published: April 29, 2017 04:29 AM2017-04-29T04:29:10+5:302017-04-29T04:29:10+5:30

पुण्यात येत्या ६ व ७ मे रोजी पहिला डिजिटल साहित्य मेळा मानला जाणारे नुक्कड साहित्य संमेलन आयोजिण्यात आले आहे.

Digital Literature Conference in Pune | पुण्यात डिजिटल साहित्य संमेलन

पुण्यात डिजिटल साहित्य संमेलन

Next

पुणे : पुण्यात येत्या ६ व ७ मे रोजी पहिला डिजिटल साहित्य मेळा मानला जाणारे नुक्कड साहित्य संमेलन आयोजिण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे आयोजित कार्र्यक्रमात संमेलनाचे उद््घाटन होईल. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य आणि एमकेसीएलचे विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
या संमेलनानिमित्त २० डिजिटल बुक्सचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या वेळी वेगवेगळ््या बारा विभागातील २४ लेखकांचा गौरव करण्यात येईल. याशिवाय ‘उमलत्या कथांचे प्रारूप’ या विषयावर चर्चा होणार असून, दुपारी ४ वाजता नुक्कड पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता ‘सहोदर’ हा कवी ग्रेस, आरती प्रभू आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या प्रकृती साधर्म्यावर आधारित साहित्य कार्यक्रम होणार आहे. त्याचे दिग्दर्शन डॉ. माधवी वैद्य यांचे असून, संगीत राहुल घोरपडे यांचे असेल.
धीरज जोशी, योगेश सोमण, अमृता कोलटकर, राहुल धोंगडे, राहुल घोरपडे यात सहभागी होतील, तर अनय गाडगीळ आणि नीलेश श्रीखंडे त्यांना साथसंगत करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी संधी आणि आव्हाने या विषयावर परिसंवाद होणार असून, त्यानंतर निवडक नुक्कड कथांचे अभिवाचन होईल. दुपारच्या सत्रात आजवरची वाटचाल, भावी दिशा याविषयी चर्चा होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Digital Literature Conference in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.