या कारणांसाठी डिजिटल पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:07+5:302021-05-12T04:11:07+5:30

* मयताचे अंत्यविधीसाठी जावयाचे असल्यास मयताशी नातेसंबंध काय याचा उल्लेख करावा. त्यासोबत मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी दाखला, गावातील सरपंच किंवा ...

Digital pass for these reasons | या कारणांसाठी डिजिटल पास

या कारणांसाठी डिजिटल पास

Next

* मयताचे अंत्यविधीसाठी जावयाचे असल्यास मयताशी नातेसंबंध काय याचा उल्लेख करावा. त्यासोबत मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी दाखला, गावातील सरपंच किंवा पोलीस यांचा दाखला किंवा हॉस्पिटल डॉक्टर दाखला यापैकी एक पुरावा.

* लग्नकरिता वधू व वर, त्यांचे आईवडील, भाऊ, बहीण, काका, आत्या, मावशी अशांना ई-पास देण्यात येणार आहे. परंतु, त्यासाठी लग्नपत्रिका जोडणे आवश्यक आहे.

ई-पासमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी

* अर्ज भरताना स्वत:चे व सोबत प्रवास करणाऱ्या लोकांचे ओळखपत्र जोडण्यात येत नाहीत.

* कोविड-१९ तपासणी निगेटिव्ह असल्याचे सर्टिफिकेट जोडले जात नाही.

* प्रवास करण्याचे कारणासंबंधित असणारी कागदपत्रे जोडली जात नाही.

* कागदपत्रे पीडीएफ करून जोडली जात नाहीत, कागदपत्रांचे फोटो अस्पष्ट असतात.

* अर्जामध्ये प्रवासाचे कारण नमूद केले जाते ते अर्धवट असते. तसेच सध्या राहण्याचा पूर्ण पत्ता नमूद केले जात नाही.

* विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचे तिकीट जोडणे आवश्यक आहे.

Web Title: Digital pass for these reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.