डिजिटल चित्रवारीचे आज सोशल मीडियावर प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:15+5:302021-07-18T04:08:15+5:30
विठ्ठालाच्या विटे पासून ते वारकरीभक्त असा प्रवास अर्थात वारी दर्शन या उपक्रमातून अनुभवता येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी, संत, आणि ...
विठ्ठालाच्या विटे पासून ते वारकरीभक्त असा प्रवास अर्थात वारी दर्शन या उपक्रमातून अनुभवता येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी, संत, आणि वारीत सहभागी होणारे वारकरी , डॉक्टर, पोलीस, लहान मुले, आरोग्य कर्मचारी, महिला यांच्यासह वारीमध्ये ज्या व्यक्तींचा सहभाग असतो अशा विविध घटकांचे १४ भागात चित्र स्केचेस करुन या स्केचेस चिञांना रंगकाम केले आहे. या चौदा स्केचेस फोटो मध्ये विठ्ठालाच्या वारीच चिञीकरण करुन या चिञीकरणाचा तीन मिनीटांचा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे. दरम्यान हा डीजीटल वारीचा सोहळा भाविकांना युट्यूब, व्हाॅटसॲप, इंस्टाग्राम, फेसबुक यासह सोशल मीडीयावर भाविकांना पाहता येईल .
कलातीर्थ संस्थेचे संस्थापक अमोल काळे , अश्वीनी काळे, प्रसाद सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओम भरमगुंडे , हर्षल वाळके , ऋषिकेश भाबड , ओंकार जंगम , संकेत पतके , राजेश पाटील , ओम संगावार , आशुतोष नवले या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे.
१७ दौंड
विठ्ठलाच्या भेटीला घाटातून मार्गस्थ होत असलेला पालखी सोहळा
१७ दौंड १
पालखी सोहळ्यातील अश्वाचे
रिंगण
१७ दौंड २
पालखी सोहाळ्यात फुगडी
खेळण्यात दंग असलेले
भाविक.