लोकसहभागातून उभारली डिजिटल शाळा

By Admin | Published: December 22, 2016 02:00 AM2016-12-22T02:00:48+5:302016-12-22T02:00:48+5:30

आदिवासीबहुल कुणेनामा गावात जिल्हा परिषदेची तालुक्यातील पहिली हायटेक, डिजिटल शाळा उभी राहिली आहे. तीही लोकवर्गणीतून.

Digital schools set up by people's participation | लोकसहभागातून उभारली डिजिटल शाळा

लोकसहभागातून उभारली डिजिटल शाळा

googlenewsNext

लोणावळा : आदिवासीबहुल कुणेनामा गावात जिल्हा परिषदेची तालुक्यातील पहिली हायटेक, डिजिटल शाळा उभी राहिली आहे. तीही लोकवर्गणीतून. लोकसहभागातून अनेक विकासकामेही झाल्याने गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळा इमारतीचे उद्घाटन आमदार संजय भेगडे व जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायतीच्या प्रशस्त व सुसज्ज इमारतीचे उद्घाटनही खासदार श्रीरंग बारणे व पंचायत समिती सदस्य आशा देशमुख यांच्या हस्ते झाले. वनोद्यानाचे भूमिपूजन आमदार भेगडे यांच्या हस्ते झाले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. विजय पाळेकर, डेल्ला अ‍ॅडव्हेंचरचे सरव्यवस्थापक इरफानभाई, वरसोली गावचे सरपंच बबन खरात, कुणेनामाच्या आदर्श सरपंच सुवर्णा पांडवे, उपसरपंच संजय ढाकोळ, ग्रामपंचायत सदस्य रामदास पांडवे, मनीषा गोजे, महादू उघडे, नमिता पिंगळे, कल्पना जोरी, जनाबाई वाघमारे, कमल वाघमारे, ग्रामसेवक आर.ए. थोरात, शाळा समिती अध्यक्ष सुधीर गोजे, रामदास शेलार, उपसरपंच संजय ढाकोळ, मुख्याध्यापक सहादू मानकर, भाऊ भिवडे, संजय खांडेभरड आदी उपस्थित होते.
साडेतीन वर्षांपूर्वी वरसोली ग्रुप ग्रामपंचायतीमधून विभक्त झाल्यानंतर लोकवर्गणी व ग्रामपंचायत निधीतून नऊ कोटींची विकासकामे कुणेनामात झाली. ग्रामपंचायतीची ७० टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. ग्रामस्थ व मुलांकरिता ४३ लाख खर्च करून वनोद्यान उभारण्यात येणार आहे. प्रा. भानुसघरे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Digital schools set up by people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.