दिलीप राजिवडे ठरला मानकरी

By admin | Published: February 21, 2017 02:41 AM2017-02-21T02:41:15+5:302017-02-21T02:41:15+5:30

शिवजयंतीनिमित्त लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत पवन मावळातील आंबेगाव

Dilip Rajived became the Manpreet | दिलीप राजिवडे ठरला मानकरी

दिलीप राजिवडे ठरला मानकरी

Next

लोणावळा : शिवजयंतीनिमित्त लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत पवन मावळातील आंबेगाव येथील दिलीप रामभाऊ राजिवडे हा ‘लोणावळा शहर युवक काँग्रेस श्री २०१७’चा मानकरी ठरला.
निखिल दाभाडे हा मोस्ट इम्प्रूव्हरचा, तर संदीप प्रजापती हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुमीत निकाळजे याने, तर तिसरा क्रमांक वरुण धोत्रे याने मिळविला.
शिवजयंतीनिमित्त लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मावळातील तुंग किल्ल्यावरून युवकांनी शिवज्योत आणत लोणावळ्यातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गवळीवाडा श्रीराम मंदिरापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. तुंगार्लीतील जाखमाता मंदिरासमोर रात्री तालुकास्तरांवरील शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. स्पर्धा पाहण्यासठी लोणावळेकर क्रीडारसिकांनी चांगली गर्दी केली होती. प्रत्येक गटातील स्पर्धक आपले शरीरसौष्ठव दाखवत असताना उपस्थितांनी प्रोत्साहन दिले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर, नगरसेवक निखिल  कविश्वर, सुधीर शिर्के, दीपक मावकर, शिवराज मावकर, नयन आकोलकर,  अतुल जोशी, फिरोज शेख,  मंगेश बालगुडे आदींच्या हस्ते  स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार  पडला. (वार्ताहर)

५५ ते ६० किलो : वरूण धोत्रे विजेता

४५० ते ५५ किलो : १) निखिल दाभाडे, २) बाळू बनसोडे, ३) शैलेष गायकवाड, ४) राजू रॉय, ५) अमित गायकवाड.
४५५ ते ६० किलो : १) वरुण धोत्रे, २) करण जांभळे , ३) चंदर नेगी, ४) योगेश गायकवाड, ५) अक्षय गोगण.
४६० ते ६५ किलो : १) संदीप प्रजापती, २) ओवज शेख, ३) राहुल देशमुख, ४) शेखर नाणेकर, ५) गौरव सातकर.
४६५ ते ७० किलो : १) सुमीत निकाळजे, २) चेतन केदारी, ३) हरीश मुंडे, ४) शादाद सय्यद, ५) गिरिधर पाटील.
४७० ते ७५ किलो : १) दिलीप राजिवडे, २) गणेश ठेंगळ, ३) सागर पगडे, ४) सलाम खान, ५) प्रतीक भालेराव.

Web Title: Dilip Rajived became the Manpreet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.