‘दिलजीत दोसांझ’चा म्युझिक कॉन्सर्टच्या कर्कशला विरोध; कार्यक्रम रद्द करा, पाटलांचा प्रशासनाला आदेश
By राजू हिंगे | Published: November 24, 2024 07:13 PM2024-11-24T19:13:27+5:302024-11-24T19:13:45+5:30
कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल, पाटलांचा इशारा
पुणे: पुण्यातील कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात आज दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणुन विरोध दर्शवत प्रशासनाला हा कार्यक्रम रदद करण्याची सुचना भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केल्या आहेत.
,पुण्यात कोथरूडमधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ च्या म्युझिक कॉन्सर्टला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच पण एक नागरिक म्हणून माझा विरोध आहे. फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही, तर या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक जाम आणि कर्कश आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा,अशा सुचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तसेच असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे.त्यामुळे कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन, अशी भुमिका चंद्रकांत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मांडली आहे. त्यामूळे दिलजीत दोसांझ यांच्या म्युझिक कॉन्सर्ट चा कार्यक्रमबाबत आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.