डिंभे धरण ९६ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 05:29 PM2023-09-08T17:29:22+5:302023-09-08T17:31:38+5:30

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही संततधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे...

Dimbhe Dam 96 percent full, release of water from the dam; Citizens urged to take care | डिंभे धरण ९६ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

डिंभे धरण ९६ टक्के भरले, धरणातून पाण्याचा विसर्ग; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

googlenewsNext

डिंभे (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू जलाशयाच्या (डिंभे धरणाच्या) पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस चाललेल्या संततधार पावसामुळे पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) जवळपास (९५. ८७) भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही संततधार पाऊस सुरु असल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

धरण क्षेत्रात संतधार पाऊस सुरु असल्याने डिंभे धरणातून आज दु . ४ वाजता प्रति सेंकदाला २८०० क्युसेस पाणी सोडले आहे. धरणाचे एकूण ३ दरवाजे उघडले असून प्रत्येक दरवाज्या वाटे ९३३ क्युसेस पाणी सोडले आहे. धरण क्षेत्रात संतधार अशीच सुरु राहिली तर अजून पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल.

यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवस चाललेल्या संतधार पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. एकूण पाऊस ५६ मी मीटर तर धरणात २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Dimbhe Dam 96 percent full, release of water from the dam; Citizens urged to take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.