बंडा तात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिंडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:38+5:302021-07-04T04:08:38+5:30
या मोर्चाला जेजुरी आणि पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. त्याच बरोबर व्यसनमुक्ती युवक संघटना पुरंदर तालुका यांनी पोलिसांना तात्काळ संतवीर ...
या मोर्चाला जेजुरी आणि पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. त्याच बरोबर व्यसनमुक्ती युवक संघटना पुरंदर तालुका यांनी पोलिसांना तात्काळ संतवीर बंडातात्या यांना मुक्त करावे. तात्यांना वारीसाठी अटी निशी मुभा द्यावी या मागण्यांचे निवेदन जेजुरी पोलिसांना देण्यात आले. या मोर्चामध्ये संत काशिनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, घडशी कृष्णाई मंदिर ट्रस्ट, गुरुदेव दत्त मंदिर ट्रस्ट आणि व्यसन मुक्त संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पुरंदर तालुका व्यसन मुक्त संघटनेचेअध्यक्ष आनंद नाईक, बाळासाहेब काळे, ह.भ.प. मोहरकर महाराज, मंगल ताई देशमुख, जानकीबाई जावळेकर, मनिषा काळे, सोमनाथ काकडे आदी उपस्थित होते .
जेजुरी येथे पोलिसांना निवेदन देताना वारकरी बांधव