दिंगबरा दिंगबराच्या जयघोषात दत्तजन्म सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:48+5:302020-12-30T04:15:48+5:30

गराडे : श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (दि २९) श्री दत्त जयंती सोहळ्याचा मुख्य दिवशी सकाळी पारंपारिक वाद्यांच्या ...

Dingbara Dingbara concludes the Datta Janma ceremony with cheers | दिंगबरा दिंगबराच्या जयघोषात दत्तजन्म सोहळ्याची सांगता

दिंगबरा दिंगबराच्या जयघोषात दत्तजन्म सोहळ्याची सांगता

googlenewsNext

गराडे : श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (दि २९) श्री दत्त जयंती सोहळ्याचा मुख्य दिवशी सकाळी पारंपारिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढून दत्तजयंती सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी सदगुरु नारायण महाराज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि फेटा घालून सत्कार करण्यात आला. यानंतर मंदिरात सामाजिक महाआरती घेण्यात आली.

पालखी मध्ये ब्रम्ह, विष्णू, महेश यांचे मुखवटे आणि श्री दत्त महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आल्या. तुताऱ्यांचा निनाद घुमला. फुलांचा वर्षाव करीत टाळ - मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीस सुरुवात झाली.

सकाळी ११. ३० वाजता मिरवणूक नारायणेश्वर महाराज यांच्या मंदिरासमोरील कुंडापाशी स्थानापन्न झाली. या ठिकाणी सद्गुरु नारायण महाराज यांच्या वतीने कुंडात पुष्पहार, फळे, फुले आदी अर्पण करून जल पूजा करण्यात आली. त्यानंतर नीरा मार्केट समितीचे सभापती बबनराव टकले, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष एम. के. गायकवाड यांच्या हस्ते मुखवटे आणि पादुकांना विधिवत शाही स्नान घालून महाआरती घेण्यात आली.

दुपारी १२. ३० वाजता मुखवटे आणि पादुका पालखीत ठेवून पुन्हा मिरवणुकीस सुरुवात झाली. संपूर्ण गावातून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मिरवणूक मंदिरात आली. या ठिकाणी पुन्हा एकदा आरती घेण्यात आली. तर दिवसभर भजनी मंडळाच्या वतीने भजन संगीत तसेच प्रवचन आणि नारायण महाराज यांच्या दर्शनाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी पुन्हा एकदा ग्राम प्रदक्षिणा घेण्यात आली. त्यानंतर रात्रीची आरती घेण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांनी गावात माधुकरी मागून आणल्यानंतर गेली तीन दिवस सुरु असलेल्या सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी मंदिर देवस्थानचे भरतनाना क्षिरसागर, रामभाऊ बोरकर, श्री नारायण धाम आयुर्वेद योग चिकित्सालयचे डॉ. उमेश कुमार डोंगरे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप,सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, ग्रामसेवक रोहित अभंग आदीसह दत्तभक्त भाविक उपस्थित होते. तीन दिवस चालणारा दत्तजयंती सोहळ्याची सुव्यवस्था करणाऱ्या प्रशासकीय अधिका-यांचे देवस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.

फोटोओळी - श्रीक्षेञ नारायणपूर ( ता.पुरंदर ) येथे १) श्री दत्त मुर्तीची केलेली आकर्षक सजावट २) दत्तमहाराजांच्या पादुकांची सदगुरु नारायण महाराजांच्या उपस्थित मिरवणूक ३) श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंती सोहळ्याची सांगता

Web Title: Dingbara Dingbara concludes the Datta Janma ceremony with cheers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.