डिंगोरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:16 AM2021-02-21T04:16:04+5:302021-02-21T04:16:04+5:30
ओतूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम शांत होत नाहीत तोच आणे माळशेज पट्ट्यातील प्रत्येक निवडणुकीत निर्णायक मतदान ...
ओतूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम शांत होत नाहीत तोच आणे माळशेज पट्ट्यातील प्रत्येक निवडणुकीत निर्णायक मतदान होत असलेल्या महत्त्वपूर्ण अशा डिंगोरे जिल्हा परिषद गटात राजकीय चक्र वेगाने फिरून राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.
शिवसेनेचे उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडांगळे, बारामती लोकसभा मतदार संघाचे संघटक गणेश कवडे, जिल्हा समनव्यक संभाजी तांबे, माजी जि. प.सदस्या लताताई आमले, डिंगोरेचे माजी सरपंच व माजी पं. स.सदस्य विश्वासराव आमले, नीलेश आमले, रवींद्र लोहटे, दिलीप उकिरडे, राजेश आचार्य, अहिलूनाना लोहोटे, पांडुरंग मंडलिक आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट:
नुकत्याच पार पडलेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्यामुळे त्याचे पडसाद उमटून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.