शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार : दिपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 14:05 IST2022-08-27T14:04:21+5:302022-08-27T14:05:18+5:30
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची लवकरच व्यापक बैठक बोलविणार असून, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ...

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार : दिपक केसरकर
पुणे :पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची लवकरच व्यापक बैठक बोलविणार असून, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल यांच्या लक्षवेधी सूचनेला केसरकर उत्तर देत होते.
केसरकर म्हणाले, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची लांबी २३.३ किलोमीटर आहे. संकल्प करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वानुसार प्रकल्पाचे काम सुरू आहे. पुढील ४० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन, सायकल ट्रॅक आणि पदपथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल.