कृषी व्यवस्थापन पदविका राहुल पडवळ राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:50+5:302021-05-19T04:09:50+5:30
विविध अभ्यासक्रमात राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी नाशिक येथे विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यपालांच्या हस्ते सत्कार होत असतो. मात्र, या वर्षी ...
विविध अभ्यासक्रमात राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी नाशिक येथे विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यपालांच्या हस्ते सत्कार होत असतो. मात्र, या वर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे हा सत्कार समारंभ रद्द झाल्याने विद्यापीठाच्या वतीने अॅड. राहुल पडवळ यांना प्रा. का. य. सोनवणे स्मृती पारितोषिक प्रमाणपत्र व दोन हजार एक रुपयांचा धनादेश पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. पडवळ यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या नारायणगाव येथील तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल या अभ्यास केंद्रातून कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. बी. आर. भुजबळ, प्राचार्य आर. एन. गायकवाड, विषय शिक्षक प्रा. चिराग भुजबळ व प्रा. डॉ. सत्यवान थोरात यांनी त्यांना यांना मार्गदर्शन केले होते.