रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन; पदभार स्वीकारताच मुंढेंचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:08 AM2022-10-07T09:08:04+5:302022-10-07T09:36:07+5:30

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात

Direct suspension if the doctor is not present at the hospital at night As soon as he took office tukaram Mundhe burst | रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन; पदभार स्वीकारताच मुंढेंचा धडाका

रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन; पदभार स्वीकारताच मुंढेंचा धडाका

googlenewsNext

पुणे : तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्‍य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंडे यांना तो देण्यात आला आहे.  राज्‍यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. त्यांनतर आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे  दिसून आले आहे. 

काल रात्री दीडच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात केली. रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर उपस्थित नसल्यास निलंबनाची कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांना शिस्त लागावी. तसेच ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात केली तपासणी ,तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली. 

पदभार स्वीकारल्यावर दिले होते निर्देश 

ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिक, सहजसाध्‍य व माफक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला पूरविण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍याच्‍या सर्व निर्देशांकांवर उत्‍कृष्‍ठ कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. सार्वजनिक आरोग्‍य सेवा अत्‍यावश्‍यक सेवा असून शासकीय आरोग्‍य संस्‍था २४ तास कार्यरत राहतील, आरोग्‍य सेवांपासुन राज्‍यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले होते. 

Web Title: Direct suspension if the doctor is not present at the hospital at night As soon as he took office tukaram Mundhe burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.