शाळा प्रवेशासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 03:32 PM2018-05-17T15:32:43+5:302018-05-17T15:32:43+5:30
दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़.
पुणे : शाळा प्रवेशाचा प्रश्न किती कठीण बनत चालला असल्याचे एका घटनेवरुन दिसून आले़. दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रणव विजय चौधरी (वय २१, रा़ सावित्री अपार्टमेंट, सोमवार पेठ) याला अटक केली आहे तसेच दोघा मुलांच्या पालकावर गुन्हा दाखल केला आहे़.
याबाबत बिशप्स कोएड स्कुलच्या वतीने शेन मेकफरसन ऊर्फ रसल फिलीप (वय ३९, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. बिशप्स कोएड या शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी व दुसरा विद्यार्थी ज्युनिअर के़ जी़ चे प्रवेशासाठी त्यांच्या पालकांनी प्रणव चौधरी यांच्याशी संगनमत करुन बिशप्स स्कुलमध्ये २३ मार्च पूर्वी भिकू इदाते अध्यक्ष मिनिस्टर स्टेटस हायकोर्ट पॉवर ज्युरिसडिक्शन मेंबर आॅफ डिफेन्स अँड हायर प्लॅनिंग कमिटी गव्हरमेंट आॅफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले पत्र तसेच देवर्षी मुखर्जी सहसचिव प्रधानमंत्री कार्यालय, न्यू दिल्ली यांचे नावाचे राजमुद्रा असलेले पत्र असे दोन्ही बनावट लेटरहेड तयार करुन ते खरे असल्याचे भासवले़ प्रणव चौधरी याने ते पालकांना दिले़. त्यांनी ते बिशप्स शाळेत दाखल करुन शाळेची फसवणूक केली़. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी अधिक तपास करत आहेत़.