स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 10:18 AM2023-05-20T10:18:15+5:302023-05-20T10:22:55+5:30

या पुलाशेजारी दुसरा  नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून  ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी आडवण्यात आले होते.

directly into the water from the Scorpio bridge in the Ghodandi vessel; Fate read as Balvattar in pune accidetn | स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले

स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले

googlenewsNext

प्रताप हिंगे

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव शिंगवे येथील घोडनदी पात्रात स्कॉर्पिओ गाडी नदीच्या पुलावरून खाली पडून दोन  जण जखमी झाले असून स्कॉर्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर  नशीब बलवंतर म्हणून दोघे थोडक्यात बचावले ही घटना शुक्रवार दि १९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची माहिती पारगाव पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली. वाहन चालक  सुरेश गोविंद दाते (वय.५८ - रा काठापूर ता.शिरूर) व नारायण डोके (वय.५० रा .शिंगवे ता.आंबेगाव) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.    

या पुलाशेजारी दुसरा  नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून  ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी आडवण्यात आले होते. त्यामुळे पुलाजवळील नदी पात्रात पाणी नव्हते यामुळे दोघांचे जीव वाचले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगवेहून सुरेश दाते अष्टविनायक रस्त्यावरुन चारचाकी  स्कॉर्पिओ( गाडी नंबर MH 12 HL 4263 ) ही भरधाव वेगाने घोडनदीवरील पारगाव च्या पुलावरून जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकी स्कॉर्पिओ पुलावरून दोन पलटी मारुन  नदी पात्रात कोसळली.यामध्ये वाहन चालक सुरेश दाते गंभीर जखमी झाले आहेत तर नारायण डोके हे किरकोळ जखमी झाले.दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुलाच्या सुरुवाच्या  ठिकाणी पुलाची उंची कमी असल्याने व पुलाजवळील नदी पात्रात पाणी नसल्याने त्यांचे जीव वाचले.घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे तपास करीत आहेत.

Web Title: directly into the water from the Scorpio bridge in the Ghodandi vessel; Fate read as Balvattar in pune accidetn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.