आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:26+5:302021-06-03T04:09:26+5:30

पुणे : बालाजीनगर-धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक, रोखपाल व मदतनिसाच्या मदतीने ४७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या ...

Director of Adarsh Nagari Sahakari Patsanstha arrested | आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेला अटक

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेला अटक

googlenewsNext

पुणे : बालाजीनगर-धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक, रोखपाल व मदतनिसाच्या मदतीने ४७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या संचालिकेला (दि. १) अटक करण्यात आली असून, न्यायालयाने ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सत्र न्यायाधीश ए.व्ही. रोट्टे यांनी हा आदेश दिला. सुनीता राजेंद्र नाईक (वय ५३ वर्षे रा.स.नं २०-१ पुण्याईनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या संचालिकेचे नाव आहे. याप्रकरणी विशेष लेखापरीक्षक विलास राजाराम काटकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संचालक तसेच पतसंस्थेचे कर्मचारी यांच्यासह ६३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजीनगर धनकवडी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २६ डिसेंबर १९९१ ते २० जानेवारी २०१८ या कालावधीमध्ये संचालक आणि पतसंस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ४७ कोटी ९ लाख ८१ हजार ७५८ रुपयांचा घोटाळा केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले. आरोपींनी कर्ज खात्यांमध्ये स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करत अपहार केला. पतसंस्थेतील ठेवीदारांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना पतसंस्थेत पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. अनेक वेळा पैशांची मागणी करून देखील पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी पतसंस्थेच्या संचालकांविरोधात तक्रार केली. आतापर्यंत १७० ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहे.

सुनीता राजेंद्र नाईक या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका आहेत. या संस्थेचे अध्यक्ष त्यांचे पती राजेंद्र नाईक होते. २० जानेवारी २०१८ ला राजेंद्र नाईक यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर सुनीता यांनी पद स्वीकारले. त्यामुळे पतसंस्थेच्या अपहारामध्ये त्यांची जबाबदारी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. नाईक यांच्या या आदर्श सहकारी पतसंस्थेत प्रत्यक्षात ठेवी जमा केलेल्या नसताना कर्ज रकमांची उचल करून या कर्जरकमा त्यांच्या संस्थेतील बचत खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. त्यांचे मुदतठेव तारण कर्जसंख्या प्रकरणे असून, त्यातील अपहारीत रक्कम ५२ लाख २० हजार रुपये तर, पुनर्गुंतवणूक ठेव तारण कर्जसंख्या प्रकरणे ९ आहेत. त्यातील अपहारीत रक्कम ३६ लाख ५० हजार रुपये आहे. ही रक्कम त्यांच्या बचत खात्यात वर्ग झाली आहे. एकूण अपहारीत रक्कम ही ९४ लाख ७० हजार अशी आहे. या गुन्हयाचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहता आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

Web Title: Director of Adarsh Nagari Sahakari Patsanstha arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.