महिला लिपिकाला असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ. धनराज मानेंना भोवले, चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:09 PM2021-11-22T17:09:41+5:302021-11-22T17:31:12+5:30

पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयात कामाला असलेल्या एक महिला माने यांच्याकडे फाईलवर सह्या घ्यायला गेल्या होत्या. यावेळी डॉ. माने यांनी सह्या घेण्यासाठी आलेल्या महिलेला असभ्य भाषा वापरली होती...

director of education dhanraj mane bawled for speaking in vulgar language inquiry order | महिला लिपिकाला असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ. धनराज मानेंना भोवले, चौकशीचे आदेश

महिला लिपिकाला असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ. धनराज मानेंना भोवले, चौकशीचे आदेश

Next

पुणे: महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलल्याप्रकरणी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने (dhanraj mane) यांची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबद्दलचे चौकशीचे आदेश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत. उच्च शिक्षण संचालनालयातील महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलल्याने या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालयात कामाला असलेल्या एक महिला माने यांच्याकडे फाईलवर सह्या घ्यायला गेल्या होत्या. यावेळी डॉ. माने यांनी सह्या घेण्यासाठी आलेल्या महिलेला असभ्य भाषा वापरली होती. ‘आतापर्यंत तू झोपली होतीस का? असे शब्द डॉ. माने यांनी उच्च शिक्षण संचालनालयातील सहकारी कर्मचाऱ्याला वापरल्याने येथील कर्मचारी वर्गाने लेखणी बंद आंदोलन केले होते. राज्यपाल नियुक्त माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर यांनी याबाबत जुलैमध्ये उच्च न्यायालयात तक्रार करीत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत सचिवांनी हे पत्र पाठवले आहे. त्याची प्रत मुल्लर यांना नुकतीच प्राप्त झाली आहे.

यापूर्वीही डॉ. माने यांनी कर्मचाऱ्यांशी केलेल्या असभ्य वर्तणुकीच्या अनेक आल्या तक्रारी आहेत. तक्रारदारांना ते भीती दाखवून तक्रार मागे घ्यायला लावत. हे प्रकरण कळताच तक्रार मागे घेतली जाऊ नये म्हणून मी उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले असून लवकरच अहवाल समोर येईल. या पूर्वीच्या काही प्रकरणात डॉ. माने यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे, असे मुल्लर यांनी सांगितले.

Web Title: director of education dhanraj mane bawled for speaking in vulgar language inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.