‘एनसीएल’च्या संचालकपदी डॉ. आशिष लेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:25+5:302021-04-02T04:11:25+5:30
मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागांमधून डॉ. लेले यांनी १९८८ मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केले आहे. त्यांनी १९९३ मध्ये ...
मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागांमधून डॉ. लेले यांनी १९८८ मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केले आहे. त्यांनी १९९३ मध्ये अमेरिकेतील डेलवेर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९९३ पासून त्यांनी एनसीएलमध्ये संशोधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी पॉलिमर डायनामिक्स, पॉलिमर प्रोसेसिंग आदी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले.
लेले यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये सुमारे ७५ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावावर ६ पेटेंट असून त्यांनी १७ पीएचडी प्रबंधाचे पर्यवेक्षण केले आहे. तसेच काही स्टार्टअप कंपन्यांना ते मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देत आहेत.
डॉ. आशिष लेले यांना २००६ मध्ये इंजिनिअरिंग सायन्स क्षेत्रातील ‘शांती स्वरूप भटनागर’पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्याचप्रमाणे २०१२ मध्ये इंजीनियरिंग ॲण्ड कम्प्युटर सायन्स क्षेत्रातील इन्फोसिसचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच १९९४ चा सीएसआयआर यंग सायंटिस्ट अवॉर्ड, १९९६ चा इंसा सायन्स सायंटिस्ट अवॉर्ड, २००३ चा यंग सायंटिस्ट अवॉर्ड, असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. तसेच लेले हे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजीनियरिंगचे ‘फेलो’आहेत.
(आशिष लेले)