प्रत्येक तालुक्यात दिव्यांग कक्ष उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:43+5:302021-03-19T04:11:43+5:30
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या वतीने प्रत्येक तालुक्यात दिव्यांग कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी ८ कोटी ...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या वतीने प्रत्येक तालुक्यात दिव्यांग कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी ८ कोटी ७९ लाख ९० हजार रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. अपंगाना भेटीगाठी आणि कामकाजासाठी सोयीचा कक्ष असावा या उद्देशाने सार्वजनिक योजनेमधून प्रत्येक तालुक्यात कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समाज कल्याण सभापती सारिका पानसरे यांनी गुरूवारी दिली. समाज कल्याण समितीची गुरूवारी मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचा २०२०-२१ चा सुधारित अंदाजपत्रकात ८ कोटी ७९ लाख ९० हजार रूपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी काही निधी हा सार्वजनिक योजनांसाठी तर काही निधी वैयक्तिक लाभासाठी नियोजित केले जाते. त्यौपकी सार्वजिनक योजनांसाठी प्रत्येक तालुक्यात अपंगाना सोयीचा कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा ठराव सदस्य बाबाजी काळे व हनुमंत बंडगर यांनी मांडला. त्याला सदस्या अंजली कांबळे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, जि. प. सदस्य किर्ती कांचन, अलका धानिवले, दिपाली काळे, सागर काटकर आदी उपस्थित होते.