अपंग कल्याण आयुक्तालय, नको रे बाबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 02:06 AM2018-12-03T02:06:20+5:302018-12-03T02:06:23+5:30
अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन झाल्यापासून गेल्या अठरा वर्षांत केवळ दोन अधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून इतर दहा अधिका-यांनी सुमारे एक ते दीड वर्षातच बदली करून घेतली आहे.
- राहुल शिंदे
पुणे : अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन झाल्यापासून गेल्या अठरा वर्षांत केवळ दोन अधिकाऱ्यांनी आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून इतर दहा अधिका-यांनी सुमारे एक ते दीड वर्षातच बदली करून घेतली आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाकडे अधिकाºयांकडून दुय्यम स्वरूपाचे काम म्हणून पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यास कोणीही वाली नाही, अशी भावना दिव्यांगांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यात सुमारे २९ लाख दिव्यांग असून त्यांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देणे, राज्य व केंद्र शासनाकडून दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया योजनांची योग्य अंमलबजावणी करणे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणे आदी कामे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयातर्फे करणे आवश्यक आहे. मात्र, अपंग कल्याण आयुक्त कार्यालय स्थापन झाल्यापासून केवळ दोन अधिकाºयांचा अपवाद वगळता बहुतांश अधिकाºयांनी केवळ एक ते दीड वर्षच या पदावर काम केले आहे. तर काही अधिकाºयांनी दोन ते आठ महिनेच आयुक्तपदी काम पाहिले आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी सोडविण्यासाठी आयुक्तांनी व आयुक्त कार्यालयातील कर्मचाºयांनी काम करणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे. आयुक्तांना न्यायालयाचा दर्जा असून त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे सर्व संस्था व अधिकाºयांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक अधिकारी या पदावर काम करण्यास उदासीन असल्याचे दिसून येते. आजही दिव्यांगांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने सार्वजनिक जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने या पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी अपंग हक्क सुरक्षा समितीकडून करण्यात आली आहे.
अपंग आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अपवादात्मक परिस्थितीत आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे सध्या राज्यात दिव्यांगांच्या सुविधांची परिस्थिती दयनीय आहे. आयुक्तालयाला स्वायत्त दर्जा नसून या कार्यालयात कर्मचारी संख्यासुद्धा कमी आहे. त्यामुळे दिव्यांगांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- हरिदास शिंदे, अध्यक्ष, अपंग हक्क सुरक्षा समिती
>अपंग कल्याण आयुक्तपदी काम केलेल्या अधिकाºयांचा कार्यकाल
अधिकाºयाचे नाव पद स्वीकारले पद सोडले
सी. ए. पाठक २४/१०/२००० २/१०/२००२
सोनिया सेटी ३/१०/२००२ ७/११/२००२
डॉ. संजय चहांदे ८/११/२००२ १९/४/२००३
डॉ. के. एच. गिविंदराज २०/४/२००३ ३०/६/२००४
आर. के. गायकवाड ८/८/२००४ ११/१/२००८
नितीन गद्रे ११/१/२००८ १०/१०/२००८
एम. एच. सावंत ७/२/२००९ ५/१०/२०१०
बाजीराव जाधव ५/१०/२०१० २८/२/२०१४
ज्ञा. स. राजुरकर २८/२/२०१४ ६/८/२०१४
नरेंद्र पोयाम २६/८/२०१४ २२/५/२०१६
नितीन पाटील १६/६/२०१६ १३/४/२०१८
रुचेश जयवंशी १९/४/२०१८ १४/११/२०१८