महापालिकेत प्रवेशावरून अपंग व सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी, रस्त्यावर थाटले ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:03 PM2018-04-05T18:03:31+5:302018-04-05T18:03:31+5:30

पुणे महापालिकेत अपंगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प असलेले स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आले आहे. या दारावर चारचाकी वाहने लावण्यात आलेली आहे

Disabled civic and security guards Controversy from the entrance into municipal corporation, Thiya movement on the road | महापालिकेत प्रवेशावरून अपंग व सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी, रस्त्यावर थाटले ठिय्या आंदोलन 

महापालिकेत प्रवेशावरून अपंग व सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी, रस्त्यावर थाटले ठिय्या आंदोलन 

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मनिषा धोत्रे यांनी सर्व अपंगाना रस्त्यावरच बैठक मारण्यास सांगितले. 

पुणे: महापालिकेच्या समाज कल्याण विभागात अपंगांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपंगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प असलेले स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आले आहे. या दारावर चारचाकी वाहने लावण्यात आलेली आहे. त्यामुळे अपंगांना आत प्रवेश करणे दुरापास्त झाले. त्यातच सुरक्षा रक्षकांनी अपंगाना तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराने जा असे सांगितले. त्यामुळे तिथे जमा झालेले सगळेच अपंग संतापले. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मनिषा धोत्रे यांनी सर्व अपंगाना रस्त्यावरच बैठक मारण्यास सांगितले. 
महापालिका इमारतीचे काम सुरू असल्यामुळे अपंगांसाठीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे वाहने लावली जातात. त्यातच सुरक्षा रक्षकांनी अपंगाना तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराने जा असे सांगितले. त्यामुळे तिथे जमा झालेले सगळेच अपंग संतापले व त्यांनी रस्त्यावरच बैठक मारत ठिय्या आंदोलन पुकारले. त्यामुळे यस्ता बंद झाला. थोड्याच वेळात तिथे पोलीस  आले. संबंधित वाहनांवर कारवाई करावी व हेच प्रवेशद्वार खुले करावे. इथे रॅम्प आहे अशी मागणी केली. गर्दी वाढू लागल्याने पोलीस कर्मचारी देखील हवालदिल झाले. समाजकल्याण अधिकारी संजय रांजणे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला, पण ते कार्यालयात उपस्थित नव्हते. सुरक्षा रक्षकांनी वाहनांवर कारवाइ करावी मात्र, दरवाजा खुला करता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनाही काही करता येईना. बराच वेळ आंदोलन सुरू होते. दरम्यान तिथे वाहतूक शाखेचे पोलिस आले. त्या वाहनांचे मालकही आले. त्यांना दंड करण्यात आला. त्यानंतर रस्ता खुला करण्यात आला.

Web Title: Disabled civic and security guards Controversy from the entrance into municipal corporation, Thiya movement on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.