दौंडच्या ऊपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाईने रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 08:01 PM2021-03-12T20:01:00+5:302021-03-12T20:02:14+5:30
कोरोना रुग्णासह इतर रुग्णांनाही फटका
दौंड: दौंड येथील ऊपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे .याचा विशेष फटका कोरोना रुग्णांना होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
दरम्यान सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयास टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. माञ यात सातत्य नसल्याची तक्रार ग्रामीण रुग्णालयाची आहे. ऊपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी रस्त्याच्या खोदाई कामात गेल्या काही वर्षा पासून नादुरुस्त आहे. याकडे दौंड नगर परिषदेचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या दिड वर्षा पासून रुग्णालयाला टँकरने पाणी पुरवठा होत असल्याचे समजते. रुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयाच्या परिसरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी तातडीने दुरुस्त करावी. जलवाहीनी द्वारे रुग्णालयास पाणी पुरवठा करावा. जेणेकरुन रुग्ण आणि आरोग्य आधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छ पाणीपुरवठा होईल. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित राहील. यासाठी नगर परिषदेकडे रुग्णालय प्रशासन सातत्याने पाठपुरावा करीत आहे माञ याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
.............................................................................................................................................................................................................ऊपजिल्हा रुग्णालय नगर परिषदेची पाणीपट्टी नित्य नियमाने भरत असूनही पाणी टँकरने घ्यावे लागते ही शोकांतिका आहे. वास्तविक पाहता रुग्ण आणि कर्मचारी यांच्या हितासाठी नळाने शुध्द पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. रुग्णालयास दररोज पाच टँकर पाणी पुरवठा अपेक्षित आहे. माञ दोन किंवा तीन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये देखील सातत्य नाही .याकामी नगर परिषदेला पञव्यव्हार करुन आम्ही थकलो आहे माञ रुग्णालयाच्या परिसरात जलवाहीनी कार्यरत केली जात नाही माञ पाणीपट्टी सक्तीने वसुल केली जाते.
संग्राम डांगे
वैद्यकीय अधिक्षक
............................................................................................................................................................................................................. ग्रामीण रुग्णालयास नित्य नियमाने दररोज दोन ते तीन टँकरने पाणी पुरवठा केला जातो. रस्त्याच्या खोदकामात जलवाहीनी नादुरुस्त आहे. लवकरच जलवाहीनीचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे रुग्णालयाच्या पाण्याचा प्रश्न राहणार नाही.
दत्ताञय क्षिरसागर
पाणी पुरवठा अधिकारी