संकेतस्थळ बंद पडल्याने गैरसोय
By admin | Published: May 11, 2017 04:51 AM2017-05-11T04:51:52+5:302017-05-11T04:51:52+5:30
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाचा सर्व्हर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाचा सर्व्हर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्जच भरता येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
भारतात कुठेही घर नसलेल्या व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना आणली आहे. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेसाठी जानेवारी महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे; मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुका असल्यामुळे या योजनेसाठी अपेक्षित एवढे अर्ज दाखल होऊ शकले नव्हते, त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी आता ७ जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत जवळपास ९० हजार अर्ज प्रशासनाकडे आले आहेत; मात्र या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे संकेतस्थळ गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंद (डाऊन) पडले आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्जच दाखल करण्यास अडचण येत आहे. हे संकेतस्थळ सेंटर इन्फॉर्म$$ेशन सेंटर येथून चालविले जात आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण देशातील नागरिकांसाठी हे एकच संकेतस्थळ असल्याने ते ‘डाऊन’ होत असल्याचे सांगण्यात आले. ज्या नागरिकांना या योजनेसाठी अर्ज दाखल करायचे आहेत, त्यांमधील बहुतांश जणांना अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सध्या सर्व्हर डाऊन असल्याने सायबर कॅफेच्या पायऱ्या जिझवाव्या लागत आहेत.