पारगावला तलाठी नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

By admin | Published: March 31, 2017 11:45 PM2017-03-31T23:45:07+5:302017-03-31T23:45:07+5:30

पारगाव (ता. दौंड) येथील तलाठी गेल्या ६ महिन्यांपासून कार्यालयात हजर नसल्याने कामे खोळंबल्याचा आरोप पारगाव

Disadvantages of the villagers due to lack of transparency | पारगावला तलाठी नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

पारगावला तलाठी नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

Next

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील तलाठी गेल्या ६ महिन्यांपासून कार्यालयात हजर नसल्याने कामे खोळंबल्याचा आरोप पारगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
पारगाव हे तालुक्यातील महत्त्वाचे महसुली गाव आहे. या तलाठी कार्यालयात पारगाव व गलांडवाडीचे सुमारे ३००० हजार शेतकरी संबंधित आहे.
६ महिन्यांपूर्वी तलाठी एस. एन. बाठे यांच्या बदलीनंतर आर. जे. फणसे यांनी पदभार स्वीकारला. तेव्हापासून फणसे हे कार्यालयात येतच नाहीत, अशी माहिती पारगाव ग्रामस्थांनी दिली.
फणसे यांच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत व तहसील कार्यालयात लेखी तक्रार दिल्या आहेत. परंतु प्रशासनाने अद्याप या तक्रारीची दखल घेतली नाही. दररोज सकाळी २०-२५ शेतकरी कामानिमित्त या कार्यालयात येतात. परंतु काम होत नसल्याने निराश होऊन माघारी जातात, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. यासंदर्भात पारगावचे ग्रामस्थ तथा दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुभाष बोत्रे म्हणाले, की तलाठी फणसे यांनी स्वत:चे खुटबाव येथील घरच तलाठी कार्यालय बनवले आहे. गरजू शेतकरी फणसे यांच्या घरी जाऊन आॅनलाइन संगणकावर सात-बारा घेतात. यामध्ये सामान्य शेतकरी भरडला जात आहे. प्रशासनाने फणसे यांची बदली न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Disadvantages of the villagers due to lack of transparency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.