मिळकत करातली वाढ अमान्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:55+5:302021-01-20T04:12:55+5:30
पुणे : स्थायी समितीने १३० कोटींच्या उत्पन्न वाढीसाठी नागरिकांना सर्वसाधारण कर, स्वच्छता कर, जलनिस्सारण करामध्ये वाढ सुचविली आहे. महापालिकेने ...
पुणे : स्थायी समितीने १३० कोटींच्या उत्पन्न वाढीसाठी नागरिकांना सर्वसाधारण कर, स्वच्छता कर, जलनिस्सारण करामध्ये वाढ सुचविली आहे. महापालिकेने सुचविलेली मिळकतकरातील वाढ मान्य करू नये, अशी मागणी आरपीआयचे नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे.
मिळकत कर विभागाने आजवरचा सर्वाधिक कर जमा केला आहे. राज्य शासनाकडून ३५० कोटी रुपये मिळाले आहेत. नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधूनही कर गोळा होणार आहे. पालिकेकडून अद्याप ६० हजार मिळकतींना कर लावणे बाकी आहे. यासोबतच मोबाइल कंपन्या, आयटी व आयटीईएस कंपन्या, दुबार मिळकती, न्यायालयात असलेली प्रकरणे या सर्वांची मिळून ५ हजार ५५० कोटींची थकबाकी येणे बाकी आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सर्वच जण आर्थिक झळ सोसत आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून सर्वसामान्यांना सवलती दिल्या जात असताना, पालिका मात्र आर्थिक भार वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे धेंडे म्हणाले.