अनर्थ टळला! एसटीच्या केबिनमधून अचानक धूर; चालकाच्या प्रसंगावधानाने ४० प्रवासी बचावले
By दा. कृ. सोमण | Published: July 5, 2023 08:57 PM2023-07-05T20:57:41+5:302023-07-05T20:57:58+5:30
चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवल्याने चाळीस प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला
मंचर: एसटी गाडीतील चालकाच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने प्रवाशी घाबरले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवल्याने चाळीस प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला. ते बालमबाल बचावले आहेत. ही घटना पुणे नाशिक महामार्गावर मंचर एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंचर येथे नंदुरबार ते पुणे या एसटी गाडीच्या चालकाच्या केबिन मधून अचानकपणे धूर येऊ लागला. परिणामी प्रवासी घाबरले. मात्र एसटीचे चालक रमेश कांबळे यांनी प्रसंगावधान राखून एसटी गाडी थांबवली. ४२ प्रवासी एसटी गाडीत होते. एस टी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना आज टळली आहे. मंचर एसटी बस स्थानकातून नंदुरबार ते पुणे एस टी गाडी बस स्थानकाच्या बाहेर पडली. ती पुण्याच्या दिशेने निघाली होती. साधारणता ३०० मीटर अंतरावर डीएसके प्राइड इमारतीजवळ एसटी गाडी जात असताना स्टेरिंगच्या सभोवाती असलेल्या वायरिंगमधून धूर आला. धूर पाहून चालक गोंधळून गेले. पण त्यांनी प्रसंगावर राखून एसटी रस्त्याच्या कडेला थांबवली. प्रवासीही दरवाज्यातून खाली उतरले. प्रवाशांना वाहक मनोज खंबाईत यांनी धीर दिला. प्रवाश्यांना अन्य एसटी गाडीत बसून देण्याची व्यवस्था केली. एसटी गाड्यांमध्ये वारंवार बिघाडाचे प्रकार घडत आहेत. यापूर्वी एकलहरे गावचे हद्दीत एसटी बस रस्ता सोडून खड्ड्यात गेली होती.