आपत्ती व्यवस्थापनाची ४८५ कर्मचाऱ्यांवर भिस्त, ४२५ पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 01:15 AM2018-10-02T01:15:58+5:302018-10-02T01:16:41+5:30

भरतीकडे दुर्लक्ष : तब्बल ४२५ पदे रिक्त

Disaster management has 485 employees, 425 posts vacant | आपत्ती व्यवस्थापनाची ४८५ कर्मचाऱ्यांवर भिस्त, ४२५ पदे रिक्त

आपत्ती व्यवस्थापनाची ४८५ कर्मचाऱ्यांवर भिस्त, ४२५ पदे रिक्त

Next

राजू इनामदार

पुणे : आपत्तीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याची सर्वाधिक महत्त्वाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ४२५ पदे रिक्त आहेत. ती भरण्याकडे प्रशासन व पदाधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच ३५ लाख लोकसंख्येचे पुणे शहर कायमच धोक्याच्या परिघात उभे राहिलेले झाले आहे.

कोणत्याही शहरात एखादी नैसर्गिक व मानवनिर्मित अशी कोणतीही आपत्ती आली तर त्या आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करण्याचे महत्त्वाचे काम अग्निशमन दलाकडे असते. त्यामुळेच काम असो किंवा नसो, हा विभाग कायम सुसज्ज असाच ठेवला जातो. ३५ लाख लोकसंख्येच्या पुणे शहराला अग्निशमन दलासाठी अधिकारी, जवान, चालक यांच्यासह एकूण ९१० पदे मंजूर म्हणजे मान्यताप्राप्त आहेत. त्यातील फक्त ४८५ पदे
सध्या भरलेली आहेत. ४२५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची सर्वाधिक म्हणजे २२५ संख्या आपत्तीत प्रत्यक्ष काम करणाºया जवानांचीच आहे.
अग्निशमन दलाकडून गेली अनेक वर्षे वारंवार या रिक्त पदांवर भरती करण्याबाबत प्रशासनाला कळवण्यात येत आहे. मात्र त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. अग्निशमन दलातील चालकासह सर्वांनाच आपत्ती निवारणाचे काम करता यायला हवे, असे बंधनकारक आहे. त्यामुळेच अधिकाºयांसाठी नागपूर येथे असलेला व जवानांसाठी मुंबई येथे असलेला अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय या विभागात भरतीच केली जात नाही. याची पूर्ण माहिती असतानाही प्रशासनाने या विभागात तब्बल ३० चालक पाठवले आहे. त्यांच्यापैकी एकाचेही असे प्रशिक्षण झालेले नाही. चालकच नसल्यामुळे अग्निशमन दलाने प्रशासनाकडे चालकांची मागणी केल्यानंतर त्यांच्याकडे असे अप्रशिक्षित चालक वाहन विभागाने पाठवून दिले.

अग्निशमन दलाचे मुख्य साधन म्हणून त्यांचे सर्व प्रकारची सामग्री असलेले वाहन. अशी लहान-मोठी एकूण ७८ वाहने अग्निशमन दलाकडे आहेत. ४८ मीटर उंचीपर्यंत जाऊ शकेल अशी शिडी असलेली २ व ७० मीटर अंतरापर्यंत पोहोचेल असे १ अशी तीन अत्याधुनिक वाहने आहेत. याशिवाय सर्व प्रकारची अत्याधुनिक साधनेही दलाकडे आहेत. महापालिका त्यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात काही कोटी रुपयांची तरतूद करत असते. मात्र, वेळ आल्यानंतर ही साधने वापरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ हवे, नेमके तेच या विभागाकडे नाही.
गेल्या काही वर्षांत अग्निशमन क्षेत्रात कितीतरी शोध लागले, सुधारणा झाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाने हा विभाग सुसज्ज करण्याचा प्रयत्न संशोधकांकडून केला जातो. त्यासाठी दलातील जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते. त्यात सातत्य ठेवले जाते. त्यांना उपकरणे हाताळण्यास देत असतात. त्याची माहिती देत असतात. त्याचे कारणच आपत्तीकाळात एकही जीव जाऊ नये हे असते. महापालिकेच्या अग्निशमन दलात
मात्र एक अभ्यासक्रम पूर्ण
करून कर्मचारी भरती झाला की
पुन्हा त्याला अपडेट करण्याचे
नावच काढले जात नाही.
कितीतरी जुने कर्मचारी या विभागात भरती करण्यात आले आहेत. ते पूर्ण क्षमतेने काम करतात हे खरे असले
तरी त्यांना अनेक मर्यादा आहेत.
मात्र हे प्रशासनाकडून लक्षात घेतले जात नाही.

प्रत्येक १० किलोमीटरच्या परिघात एक अग्निशमन केंद्र असणे बंधनकारक आहे. पुणे शहराचा परीघ साधारण २४३ किलोमीटरचा आहे. त्यानुसार एकूण २६ केंद्र असणे आवश्यक आहे. त्याशिवाय झोपडपट्टी व वसाहतींची गर्दी असलेल्या ठिकाणी काही केंदे्र असली पाहिजेत, असाही नियम आहे. अशी एकूण ३५ केंद्रे पुणे शहरात असायला हवी.

प्रत्यक्षात मात्र फक्त १३ केंद्रे पुणे शहरात आहेत. २ केंदे्र बांधून तयार आहेत, मात्र तिथे नियुक्त करण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच नसल्यामुळे ती सुरूच करण्यात आलेली नाहीत.

४ केंद्रांच्या जागा ताब्यात आल्या आहेत, मात्र मनुष्यबळच नसल्यामुळे तिथे कामच सुरू करण्यात आलेले नाही. फक्त १३ केंद्रांवरच अग्निशमन दलाचे काम गेली काही वर्षे सुरू आहे.

गेल्या काही वर्षांत शहराचा मोठा विस्तार झाला. त्याचबरोबर आपत्तीचा धोकाही वाढला आहे. त्यातून वाचण्यासाठी म्हणून जी व्यवस्था असते तीच अपुºया मनुष्यबळाने हैराण आहे.

 

Web Title: Disaster management has 485 employees, 425 posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.