घोटवडेत आपत्ती व्यवस्थापन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:41+5:302021-03-23T04:12:41+5:30
-- घोटवडे : घोटवडे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत सभागृहात आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली त्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ...
--
घोटवडे : घोटवडे (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत सभागृहात आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली त्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लसीकरण नोंद करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली.
प्रथम सदर विषयाची जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावणे व भोंग्याच्या गाडीतून नागरिकांना लसीकरणासाठी नावे नोंद करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर लावणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादी विषयी दवंडी देणे, गाव व परिसरातील किराणा दुकानदार, हॉटेल, स्वीट मार्ट, भाजीपाला विक्रेते यांच्या दुकानासमोर बांबू किंवा दोरी बंधने व दुकानासमोर गर्दी न करणे, आशा नोटीस देणे, शासकिय कार्यालये त्यामध्ये ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडलअधिकारी कार्यालय ,सहकारी सोसायटी ,बॅंका, याठिकाणी शासकीय आदेशाचे पालन करणे ,नियमामाचे पालन करणे गर्दी न करता कमीतकमी लोक एकत्र येतील ,व सदर काळात। समाजासाठी कामे करणारे कर्मचारी त्यात अंगणवाडी शिक्षक ,सहायक, आशावर्कर ,ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, यांना सहकार्य करणे व चागली वागणूक देणे, कारण ते जीवाची बाजी लावून कामे करतात , सदर प्रसंगी सरपंच स्वाती भेगडे ,उपसरपंच। भिमाजी केसवड ,ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे ,हनुमंत घोगरे , संभाजी गोडाबे ,भाग्यश्री देवकर ,सारिका खाणेकर, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर, गाव कामगार तलाठी स्नेहल दिवटे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉ दीपाली कांबळे ,अंगणवाडी शिक्षक मंगल भेगडे , उज्वला भेगडे , शीतल घायतळे , आशावर्कर ,शुभांगी केसवड ,अस्विनी देवकर , पोलीस पाटील सुनील माकर ,अर्चना गोडाबे ,सविता आमराळे, व अजित भेगडे शासकीय नियमाचे पालन करून हजर होते