घोटवडेत आपत्ती व्यवस्थापन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:20+5:302021-04-14T04:09:20+5:30
सभेमध्ये गावस्तरीय समिती स्थापन करण्यात आली, ...
सभेमध्ये गावस्तरीय समिती स्थापन करण्यात आली, त्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी तीन शाळांच्या इमारतीची निवड केली. तसेच दुकानदार व्यवसायिक यांना शासनाने दिलेल्या वेळेतच दुकाने उघडणे व बंद करणे, गर्दी न करणे, शासकीय नियम पाळणे बंधनकारक राहील नियमाचे उल्लंघन केल्यास दुकाने सील करणे, परिसरात जंतुनाशक फवारणी सुरू असून ती कायम ठेवणे, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आहे, त्याची काटेकोर अंमलबाजावणी करणे, अंत्यविधी, दशक्रियासारखे विधिक कार्यक्रमातील गर्दीवर निर्बंध लावणे आदी विषयांवर निर्णय घेण्यात आला.
या वेळी गट विकास अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन चाललेल्या लसीकरणाची पाहणी केली. त्यामध्ये एप्रिल २०२१ मध्ये ९०० नागरिकांचे लसीकरण झाले व ते सुरूच राहील त्यावेळी शासकीय नियमांचे पालन करून लसीकरण चालू ठेवावे असे सांगितले. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली कांबळे, ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर, सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके, भाग्यश्री देवकर, सारिका खाणेकर, भोर विधानसभा संघटक (शिवसेना) प्रकाश भेगडे, संतोष गोडांबे, पोलीस पाटील किरण शेळके, दीपक मातेरे, सविता आम्राळे, सुनील माकर, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका व सहायिका, ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री देवकर सारिका खाणेकर हजर होते.
--