आपत्ती व्यवस्थापन आराखडा कागदावरच

By admin | Published: May 31, 2017 02:59 AM2017-05-31T02:59:10+5:302017-05-31T02:59:10+5:30

पावसाळा दारात येऊन ठेपला असतानाही महापालिकेच्या प्रशासनाने शहराचा यंदाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही तयार केलेला

Disaster management plan on paper | आपत्ती व्यवस्थापन आराखडा कागदावरच

आपत्ती व्यवस्थापन आराखडा कागदावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाळा दारात येऊन ठेपला असतानाही महापालिकेच्या प्रशासनाने शहराचा यंदाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यापही तयार केलेला नाही. पावसाळी गटारे साफ करण्याचे काम असो की पावसाळ््यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती आणि आता शहराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा सर्वच कामे महापालिका प्रशासनाचा कारभार वरातीमागून घोडे असल्याचे दिसत आहे. आराखड्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. ३१) महापालिका प्रशासनाने बैठक आयोजित केली आहे.
पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात शहराचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. या आराखड्यात शहरामध्ये पावसाळ््यातील धोकादायक ठिकाणे, एखादी दुर्घटना उद्भवू शकणारे ठिकाण, त्या घडल्यानंतर आवश्यक उपायांची माहिती असलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये असते. तसेच पुणे शहरातून मुळा-मुठा या दोन प्रमुख नद्या जात असल्याने धरणांमधून किती पाणी सोडल्यावर कोणत्या भागात पूर येऊ शकतो, किती लोकांना स्थलांतर करावे लागले, त्यासाठी कोणते ठिकाण असले, याबाबतची सर्व माहिती या आराखड्यात समाविष्ट असते. याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात नेमणूक केलेले अधिकारी यांच्या मोबाईल क्रमांक व अग्निशमन दलाचे मोबाईल आदी सर्व माहिती या देण्यात येते.
परंतु अद्यापही हा आराखडा तयार झालेला नाही. संभाव्य आराखड्यावर चर्चा करण्यासाठी बुधावर (दि. ३१) रोजी महापालिका प्रशासनाने बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर साधारण ७ जूनपर्यंत हा आराखडा प्रत्यक्ष उपलब्ध होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे उशीर
सध्या महापालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांच्या विभागानुसार मोबाईल नंबर दिले जातात. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर आराखड्याची छपाई करण्यात येईल. प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. यावार बुधवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा करून अंतिम करण्यात येईल.
- गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Web Title: Disaster management plan on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.