महिला सरपंचाविरोधात अविश्वास ठराव
By Admin | Published: May 19, 2017 04:31 AM2017-05-19T04:31:04+5:302017-05-19T04:31:04+5:30
वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात अविश्वासदर्शक ठराव तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. यावर सदस्य मंडळातील
- लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरोधात अविश्वासदर्शक ठराव तहसीलदारांकडे दाखल करण्यात आला आहे. यावर सदस्य मंडळातील १७ पैकी ८ सदस्यांच्या सह्या आहेत. सरपंच विश्वासात घेऊन काम करीत नसल्याचे कारण देऊन आठ सदस्यांनी सरपंच आकांक्षा शिंदे यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.
ठरावाच्या बाजूने संगीता राजकुमार शहा, ज्योती मोहन हिरवे, जयश्री भिमाजी साळुंके, अर्चना नितीन राऊत, मनीषा बाळासाहेब माने, सतीश त्रिंबक जाधव, माणिक शंकर गायकवाड, मनोजकुमार यशवंत साळवे यांनी सह्या केल्या आहेत. ठरावावरून तहसीलदारांनी सोमवारी (दि. २२) ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची विशेष बैठक बोलावली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सरपंचाविरोधात याच सदस्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
जिल्हा परिषदेला दिलेल्या लेखी तक्रारींवरून जिल्हा चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. अधिकाऱ्यांनी दप्तर तपासणी केली होती. याचा अहवाल येण्यापूर्वीच सरपंचावर अविश्वास ठराव दाखल केला आहे.