वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:32+5:302021-07-24T04:09:32+5:30
नीरा : वीर धरण क्षेत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने ...
नीरा : वीर धरण क्षेत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरण विद्युत गृहातून रात्री ८:०० वाजता ८०० क्युसेक वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु होत आहे.
पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावातील सर्वांनी काळजी घ्यावी, निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आव्हान निरा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
वीर धरण शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता ७१ टक्के भरले होते. धरण साखळीत पावसाचे प्रमाण वाढते असल्याने सायंकाळी आठ वाजता विद्युत गृहातून ८०० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला. धराणीतल पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यानंतर नदितिरावरील सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे आव्हाण तीरावरील गावातील प्रशासनाला देण्यात आला आहे.