शिस्तबद्ध, शास्वत पर्यटनामुळे दीर्घकालीन रोजगार निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:35+5:302021-02-10T04:10:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेघर : शिस्तबद्ध व शाश्वत पर्यटन या भागात दिर्घकालीन रोजगार निर्मिती करू शकते. यासाठी आंबेगाव ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : शिस्तबद्ध व शाश्वत पर्यटन या भागात दिर्घकालीन रोजगार निर्मिती करू शकते. यासाठी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील व भीमाशंकर परिसरातील स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर- दातार यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथील शहीद राजगुरू ग्रंथालय, येथे महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ व सोशल मिरर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन क्षेत्रातील विविध संधी या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी सुप्रिया करमरकर बोलत होत्या. एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या ९० प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींना शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती सांगण्यात आली. भीमाशंकर परिसरासह इतर भागात सांस्कृतिक ओळख जपत पर्यटनाच्या अनुषंगाने रोजगार निर्मितीची विविध क्षेत्र काय असू शकतात आदी विविध पर्यटन क्षेत्रातील माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मनोज हाडवले, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, जीएसटीचे उपायुक्त महेश जगताप, माजी नायब तहसीलदार विजय केंगले, समीर गारे, रवींद्र वायाळ, अशोक पेकारी, कांताराम लोहकरे, दत्तात्रय लोहकरे विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कृषी अधिकारी, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो ओळ : ‘पर्यटन क्षेत्रातील विविध संधी’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलताना सुप्रिया करमरकर- दातार.