कोरोना रुग्णांसाठी सवलतीच्या दरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:15+5:302021-04-15T04:09:15+5:30
बारामती: राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात रोज २०० च्या पुढे रुग्ण सापडत आहे. कोविड तालुका म्हणून बारामतीची ओळख होत ...
बारामती: राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात रोज २०० च्या पुढे रुग्ण सापडत आहे. कोविड तालुका म्हणून बारामतीची ओळख होत आहे. याच दरम्यान, वाढत्या रुग्णांचा गैरफायदा घेत काहींजणांकडून रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. मात्र, येथील डॉ. पांडुरंग गावडे यांनी नाममात्र शुक्ल आकारून कोविड रुग्णांसाठी छातीचा स्कॅन करण्याची सुविधा देऊ केली आहे.
कोविड रुग्णांना छातीचा स्कॅन करावा लागतो. यासाठी बाहेर २५०० ते ५००० मोजावे लागतात. परंतु गावडे हॉस्पिटलमध्ये सामाजिक बांधिलकेतून १५०० रुपयांमध्ये स्कॅन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा फायदा बारामती, इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यांतील शेकडो रुग्ण घेत आहेत.
कोरोना महामारीत बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले, शेती व्यवसाय ठप्प झाला लोकांना आर्थिक मंदीला सामोरे जाऊ लागले. यामध्ये बरेच घरे उद्ध्वस्त झाले.त्यातच घरामध्ये एकाला कोरोना झाला. तर कुटुंबातील सर्वच व्यक्तीला कोरोना होत आहे. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती भयानक झाली आहे. अशा या संकटात कोरोना रुग्णांचा छातीचा स्कॅन सवलतीच्या दरात मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे १५००० ते २०००० रुपयांची बचत होत आहे. डॉ. गावडे यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
————————————————