सुर्यापासून उत्सर्जीत होणाऱ्या तोफगोळा सद्रुश प्रक्रियेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:01+5:302021-07-16T04:10:01+5:30
खोडद : इंडियन पल्सर टायमिंग अॅरेच्या(आयएनपीटीए) बॅनरखाली जवळपास २० खगोलशास्त्रज्ञांच्या गटाला प्रथमच सुधारीत महाकाय मीटर-वेव्ह रेडिओ टेलीस्कोपचा (यूजीएमआरटी) ...
खोडद : इंडियन पल्सर टायमिंग अॅरेच्या(आयएनपीटीए) बॅनरखाली जवळपास २० खगोलशास्त्रज्ञांच्या गटाला प्रथमच सुधारीत महाकाय मीटर-वेव्ह रेडिओ टेलीस्कोपचा (यूजीएमआरटी) वापर करून मिलीसेकंद पल्सारकडून मिळालेल्या सिग्नलमध्ये सूर्यापासून होणाऱ्या कोरोनल मास इजेक्शनचा (सीएमई) चा प्रभाव आढळला. सूर्यापासून पल्सारवर होणाऱ्या अंतराळ हवामानाचा या प्रकारचा प्रभाव हा आजपर्यंत पहिल्यांदाच नोंदविला आहे. केवळ यूजीएमआरटीच्या अद्वितीय वाइडबँड आणि कमी वारंवारतेच्या क्षमतेमुळे हे शक्य झाल्याची माहिती जी.एम.आर.टी. चे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी यांनी दिली.
इंडियनपल्सार टायमिंग अॅरे (आयएनपीटीए) हा जवळपास २० खगोलशास्त्रज्ञांचा, विश्वातील सर्वात अचूक घड्याळ, “पल्सार” चा अभ्यास करणारा एक गट आहे. पल्सार ही भव्य ताऱ्यांची शेवटची उत्पादने आहेत. ते खूप भव्य असून अत्यंत वेगाने फिरतात. ते फिरत असताना, त्यातून निघणारे रेडिओ लहरींचे बीम आकाशात पसरतात, आणि उच्च पातळीवर ठराविक कालावधीनंतर रेडिओफ्लॅश प्रमाणे चमकतांना दिसतात.
आयएनपीटीए या घड्याळांकडून निघणारे सिग्नल, अपग्रेड केलेल्या जाइंट मीटर-वेव्ह रेडिओ टेलीस्कोप (यूजीएमआरटी ) चा वापर करून, दर १४ दिवसांनी एकदा, अत्यंत कमी-वारंवारतेच्या गुरुत्वाकर्षणाच्या लाटा शोधण्यासाठी रेकॉर्ड करते. गुरुत्वाकर्षणाच्या लाटा असल्याचे भाकित आइन्स्टाईने केलेले आणि त्या अंतराळ आणि वेळेतील लहरी आहेत. या लाटा बाजूने जातांना पल्सार घड्याळांची स्पंदनं बदलतात. उच्च वारंवारता असणार्या गुरुत्वाकर्षणाच्या लाटा लिगो आणि व्हर्गो सारख्या टेरेस्ट्रीअल डिटेक्टर्सचा वापर करून शोधल्या जात असल्या तरी, कमी वारंवारीतेच्या गुरुत्वाकर्षणाच्या लाटा पल्सारच्या घड्याळ काळातील बदल वापरून शोधल्या जाऊ शकतात. अन्य आंतरराष्ट्रीय पल्सार टाईमिंग ग्रुपसमवेत, आयएनपीटीए , गुरुत्वीय लहरींचे अत्यल्प-फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम शोधण्याचे लक्ष्य असणार्या आंतरराष्ट्रीय पल्सार टायमिंग अॅरे (आयपीटीए) कन्सोर्टियमचे सदस्य आहे .
भालचंद्र जोशी (एनसीआरए-टीआयएफआर, पुणे), मंजरी बागची (आयएमएससी, चेन्नई), ए.गोपाकुमार (टीआयएफआर, मुंबई), शांतनू देसाई (आयआयटी, हैदराबाद), टी. प्रभू (आरआरआय, बेंगलुरु), एम. ए. कृष्णकुमार (युनिव्हर्सिटी बिलेफेल्ड, जर्मनी) या शास्त्रज्ञांनी या संशोधनात सहभाग घेतल्याचे डॉ. सोळंकी यांनी सांगितले.
हा सौर प्रसंग अंतराळ-आधारित उपग्रहांनी शोधून काढला आणि तो पृथ्वीच्या दिशेने निर्देशित केला. सीएमईच्या मॅग्निटाइज्ड-प्लाझ्माचा मोठा बबल वेगवान सौर वार्याने संकुचित केला, त्यामुळे पल्सारच्या दर्शनी भागात दाट प्लाझ्मा प्रदेश बनला. पल्सार सिग्नल २४ फेब्रुवारी २०१९ रोजी या अत्यधिक संकुचित माध्यमामधून गेल्यामुळे पल्सार सिग्नलच्या अतिरिक्त विलंबाला आणि त्याचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरले. पल्सारवरील अंतराळ हवामानाचा अशा प्रकारचा प्रभाव हा आतापर्यंत प्रथमच नोंदविलेला आहे.
---
चौकट
"अद्ययावत जीएमआरटी मुळे अनेक नवनवीन शोध लागत असुन वेगवेगळ्या रहस्याचा उलगडा पहिल्यांदा होत आहे.खगोल शास्त्रीय संशोधनासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे."
प्रा.यशवंत गुप्ता, केंद्र संचालक एनसीआरए
---
फोटो : १५ खोडद जीएमआरटी शोध