गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध, ब्रह्मांड निर्मितीचे कोडे उलगडू शकते, पुण्याच्या जीएमआरटीचा मोठा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:56 PM2023-06-30T12:56:36+5:302023-06-30T13:02:47+5:30
Pune:
पुणे - कमी वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा खगोलशास्त्रज्ञांना मिळाला आहे. पुढील काही वर्षांत सर्व आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ एकत्र येऊन या गुरुत्व लहरींचा अभ्यास करून ब्रह्मांड तयार होताना अगदी सुरुवातीच्या काळात काय घडले असेल, याचा अंदाज बांधू शकणार आहेत. आता केवळ गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या विषयाची माहिती गुरुवारी जीएमआरटीचे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी दिली. गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व टिपण्यासाठी भारत, जपान खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने काम केले. त्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका पुणे जिल्ह्यात असलेल्या खोडदच्या 'जीएमआरटी' या महाकाय रेडिओ दुर्बिणीची आहे.
आताच्या निष्कर्षांमधून अतिशय कमी मिळाले आहेत. वारंवारिता असलेल्या गुरुत्वीय महाकाय लहरींमुळे निर्माण झालेल्या ब्रह्मांडाच्या सातत्यपूर्ण स्पंदनांचे पुरावे मिळाले आहेत. महाकाय कृष्णविवरांच्या संयोगांमधून या गुरुत्वीय लहरी तयार होत असाव्यात, असे मानले जात होते.
यामुळे गुरुत्वीय लहरी
आकाशगंगेच्या केंद्रांमध्ये महाकाय कृष्णविवरे असतात, या संशोधनाला २०२० चे खगोलशास्त्राचे नोबेल पारितोषक मिळाले होते. जेव्हा आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होतात, तेव्हा त्यांच्या केंद्रांमधील कृष्णविवरेदेखील एकमेकांत विलीन होतात. ब्रह्मांडात सर्वत्र आणि सर्व दिशांना अशा विलीनीकरणाच्या घटना घडत असतात. त्यामुळे गुरुत्वीय लहरीही सर्व दिशांनी तयार होतात. या लहरींच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला आहे.
आमच्या वैशिष्ट्यपूर्ण जीएमआरटी नोंदीचा वापर गुरुत्वीय लहरी खगोलशास्त्रावर चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी होताना पाहणे विलक्षण आहे. २०१३- २०१९ दरम्यान आम्ही जीएमआरटीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे पल्सरच्या अचूक वेळा नोंदविणे हे एक महत्त्वाचे वैज्ञानिक लक्ष्य होते. पहिल्या काही वर्षांत याला फळ येत असल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. - प्रा. यशवंत गुप्ता, केंद्र संचालक, एनसीआरए जीएमआरटी