इथे झडतात ‘फ्लॉप’ चित्रपटांवर चर्चा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:17 PM2018-08-13T20:17:34+5:302018-08-13T20:26:08+5:30

आजच्या जमान्यात हे चित्रपट कदाचित सुमार दर्जाचे ठरू शकतील...मात्र अशा चित्रपटांच्या चाहत्यांच्या प्रेमापोटी हा ग्रुप हिट झाला आहे. ग्रुपचे जवळपास ११  हजाराच्या वर सदस्य आहेत हे ऐकून धक्का बसेल! 

Discuss on 'flops' cinema in here | इथे झडतात ‘फ्लॉप’ चित्रपटांवर चर्चा....

इथे झडतात ‘फ्लॉप’ चित्रपटांवर चर्चा....

Next
ठळक मुद्देया ग्रृपचे जवळपास ११ हजाराच्या वर सदस्य आहेत हे ऐकून धक्का बसेल! ब किंवा क वर्गात मोडणा-या या चित्रपटांनीही प्रेक्षकांचे केले यथेच्छ मनोरंजन

नम्रता फडणीस 
पुणे :  सोशल मीडियावर कधी काय हिट होईल याचा काही नेम नाही. एका रात्रीत गल्ली बोळातली पोरं चर्चेचा विषय ठरतात.फक्त इथे जे काही हवं आहे ते हटके...एकदा का तरुणाईच्या मनाचा या गोष्टींनी मन जिंकले की तुमचं काम सोपं झालं म्हणूनच समजा.. तसंच एक भन्नाटपची  सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आता लाखो ग्रृप आहे त्यातला नक्की कोणता? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण त्या ग्रुपच्या नावातच विषयाचा वेगळेपणा आहे, त्या ग्रुपचे नाव आहे आय लव्ह ट्रॅशी हिंदी मुव्हीज एक जमाना असा होता की चित्रपटांमध्ये उत्तम संहितेपेक्षाही भन्नाट वेशभूषा, जबरदस्त संवाद फेक अशाच अशक्यप्राय वाटणा-या गोष्टींच्या भडिमारामुळे कित्येकदा प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट व्हायची. तरीही काहीशा ब किंवा क वर्गात मोडणा-या या चित्रपटांनीही प्रेक्षकांचे यथेच्छ मनोरंजन केले..आजच्या जमान्यात हे चित्रपट कदाचित सुमार दर्जाचे ठरू शकतील...मात्र अशा चित्रपटांच्या चाहत्या वगार्मुळेच हा ग्रृप हिट झाला असून, या ग्रृपचे जवळपास ११ हजाराच्या वर सदस्य आहेत हे ऐकून धक्का बसेल! 
आतंक ही आतंक,दर्या दिल,जुल्म की हुकुमत,खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान या अशा चित्रपटांची नावे कधी ऐकली आहेत का? आठवून पहा, कितीही डोकं खाजवलत तरी उत्तर नाही असचं येईल.मात्र, अशा चित्रपटांवर जर तुम्ही मनापासून प्रेम करणारे असाल तर तुमचे या ग्रृपवर स्वागत आहे. आता ट्रॅशी म्हणजे काय? हे चित्रपट फ्लॉप,गलिच्छ कि भीतीदायक नक्की कोणत्या वर्गात मोडणारे आहेत, असा एक विचार मनात येऊ शकतो. खलनायकाचे भन्नाट संवाद, पांढरे बूट, टिपिकल वाक्य अशा काही विशिष्ट गोष्टी या चित्रपटांची ओळख आहे.  हे असे चित्रपट कदाचित बोअरिंग वाटू शकतात. या चित्रपटांमधून काही अभिनेत्यांवर अयशस्विततेचा ठपका बसला असला तरी या चित्रपटांमध्ये काम करणे हे धाडसीपणाचे आहे. या चित्रपटांचे स्मरण करून कुणा व्यक्तीची खिल्ली उडविण्याचा हेतू नाही तर असेही चित्रपट होऊन गेले ज्यातून ख-या अर्थाने हसण्यातून मनोरंजन झाले पण त्यांच्यावर फ्लॉप चा ठपका बसला. इतकाच या ग्रृपनिर्मितीचा हेतू असल्याचे सुरूवातीलाच अडमिनकडून स्टेटसमध्ये नमूद करण्यात आले आहे.या ग्रृपने दहा हजार सदस्यांचा टप्पा पार केल्यामुळे या चित्रपटांचा देखील एक चाहता वर्ग आहे हे यातून स्पष्ट होते. 
या ग्रृपवर भारतातल्या प्रादेशिक चित्रपटांची पोस्टर टाकली जातात, कुणी एखादा चित्रपटही टाकतो, कुणी संवाद टाकतो, एखाद्या चित्रपटातला प्रसंग, तो कशा पद्धतीने सादर झाला त्यात कशावर भर दिला गेलाय, याविषयीच्या चर्चा घडतात. विशेष म्हणजे, दोन वर्षांपासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम हे देखील या ग्रृपचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्याकडून ह्यलोकमतह्ण ला या अभिनव ग्रृपची माहिती मिळाली. 
------------------------------------------------------------
आय लव्ह ट्रॅशी हिंदी मुव्हीज या ग्रृपशी दोन वर्षांपासून संलग्न आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे डॉक्यूमेंटेशन इथे पाहायला मिळते. या चित्रपटांची माहिती मिळण्याबरोबरच सदस्यांकडून सातत्याने ग्रृपवर चित्रपटांचे जे पोस्टर टाकले जातात ते सहजासहजी कुठे उपलब्ध होत नाहीत. हे चित्रपट कदाचित दर्जात्मक नसतीलही. पण चित्रपट जतनाच्या दृष्टीकोनातून त्यांचे निश्चितच महत्व आहे- प्रकाश मगदूम, संचालक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

Web Title: Discuss on 'flops' cinema in here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.