शिक्षण व्यवस्थेतील आव्हानांवर पुण्यात रंगणार चर्चासत्र; विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:41 PM2018-02-13T16:41:06+5:302018-02-13T16:51:46+5:30

‘शिक्षण व्यवस्थेतील वाढते धोके’ या विषयावर  येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात राज्यस्तरीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत.

The discussion session will be held in Pune on education challenges; Expert Participation with Students | शिक्षण व्यवस्थेतील आव्हानांवर पुण्यात रंगणार चर्चासत्र; विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांचा सहभाग

शिक्षण व्यवस्थेतील आव्हानांवर पुण्यात रंगणार चर्चासत्र; विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवार दि. १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता संमेलनाला सुरवातविचारवेध असोसिएशन आणि एस. एस. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने आयोजन

पुणे : ‘शिक्षण व्यवस्थेतील वाढते धोके’ या विषयावर  येत्या १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात राज्यस्तरीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  देशभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. 
विचारवेध असोसिएशन आणि एस. एस. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने  हे दोन दिवसीय संमेलन नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात संपन्न होणार आहे. शनिवार दि. १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता संमेलनाला सुरवात होईल. पहिल्या सत्रात ‘शिक्षणातील सांप्रदायिकरण’ या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये दिल्ली विद्यापीठाचे प्रा. डॉ. अपूर्वानंद झा, प्रा. जयदेव डोळे आणि कर्नाटकातील  हंपी विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुरेश भट हे शिक्षणतज्ज्ञ सहभागी होतील. सरिता आवाड या विचारवेधची भूमिका मांडतील. तर प्रा. ओमप्रकाश मलमे हे विचारवेध संमेलनाची भूमिका मांडतील.
त्यानंतर ‘शिक्षण क्षेत्रातील संघर्षात्मक काम करताना भिडलेले वास्तव व येणाऱ्या समस्या’या सत्रात विद्यार्थी आंदोलनातील विद्यार्थी नेते दत्ता ढगे हे सादरीकरण करतील. तर डोंथा प्रशांत हे भूमिका विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील. दुपारच्या सत्रात ‘शिक्षणातील लिंगभाव’ याविषयावर सामाजिक कार्यकर्त्या निशा शिऊरकर आणि दिशा शेख या मांडणी करतील. त्यानंतर ‘वंचिताचे शिक्षण’ या विषयावर पद्मा वेलस्कर, प्रणित सिन्हा हे मांडणी करतील. 
संध्याकाळी ‘आजका समय और कविता’ या कवी संमेलनात गजानन परांजपे, अक्षय वाटवे, गणेश विसपुते हे सहभागी होतील. त्यानंतर ठाणे येथील समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीन ‘वंचितांच्या रंगमंचावरील नाटीका’ सादर करतील. 
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारीला सकाळी ‘शिक्षणाचे बाजारीकरण’ ह्या विषयावर जन्ध्याला टिळक, दिलीप चव्हाण, संजय दाभाडे हे आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ‘शिक्षण क्षेत्रातील संघर्षात्मक काम करताना भिडलेले वास्तव व येणाऱ्या समस्या’या सत्रात विद्यार्थी आंदोलनातील विद्यार्थी नेते प्रवीण खुंटे, अद्वैत दंडवते, प्रतिक वडमारे हे सहभागी होतील.   
दुपारच्या सत्रात निबंध स्पर्धेतील निवडक निबंधाचे वाचन, व्हिडिओ सादरीकरण आणि खुले सत्र होईल. आनंद करंदीकर हे विचारवेधची पुढची दिशा स्पष्ट करतील. त्यानंतर चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, विभावरी देशपांडे हे ‘आज या देशामध्ये....हा कवितांचा कार्यक्रम सादर करतील. 

Web Title: The discussion session will be held in Pune on education challenges; Expert Participation with Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे