पीएमआरडीला आकार देणारे महेश झगडे यांच्या बदलीने असंतोष

By admin | Published: April 23, 2017 04:22 AM2017-04-23T04:22:22+5:302017-04-23T04:22:22+5:30

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळात धडाकेबाज काम करीत विविध योजना आखणारे मुख्य कार्यकारी

Disgruntled Mahesh Jagde, who shaped the PMRD, was dissatisfied | पीएमआरडीला आकार देणारे महेश झगडे यांच्या बदलीने असंतोष

पीएमआरडीला आकार देणारे महेश झगडे यांच्या बदलीने असंतोष

Next

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्यानंतर अवघ्या अडीच वर्षांच्या काळात धडाकेबाज काम करीत विविध योजना आखणारे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे असंतोष व्यक्त होत आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प, रिंगरोड, विकास आराखडा यांच्या माध्यमातून पीएमआरडीएच्या कामाला आकार दिला होता. दोन वर्षे पूर्ण व्हायच्या आतच त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तुलनेने नवीन असणाऱ्या किरण गिट्टे यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकाने तब्बल १५ वर्षांपासून रखडलेल्या पीएमआरडीएच्या स्थापनेला मंजूरी दिली.
१५ मे २०१५ रोजी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या पीएमआरडीएच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा झगडे यांच्या हातात देण्यात आली.
मुख्यमंत्री या प्राधीकरणाचे अध्यक्ष आहेत. झगडे यांनी पीएमआरडीएचा पदभार स्विकारला या वेळी अनेक अडचणी होत्या. साधे कार्यालयही नव्हते.
कर्मचाऱ्यांची नेमणू्र झालेली नव्हती. निधीचा प्रश्न होता. त्याचबरोबर पीएमआरडीएच्या कामासाठी निधीची कोणतीही तरतूद नव्हती.
सर्वात महत्वाचे म्हणजे पीएमआरडीएचे अधिकारांबाबतही स्पष्टता नव्हती. या सगळ्यांशी सामना करीत झगडे यांनी धडाक्याने कामास सुरूवात केली.
पीएमआरडीएच्या कामांना प्रचंड गती दिली. पीएमआरडीएच्या कार्यालयासाठी येरवडा येथे जागा उपलब्ध करून घेतली व कार्यालयाचे काम देखील सुरू केले.
पीएमआरडीएचे कार्यत्रक्षेत्र सुरूवातीला ३ हजार ३६० चौरस किलोमीटर होते. यामध्ये वाढ करून तब्बल ६ हजार ६०० चौरस किलोमीटर झाले. या सर्व क्षेत्रांत नियोजनपूर्वक कामाचे शिवधनुष्य पेलण्याची अवघड जबाबदारी झगडे यांच्यावर होाती. त्यांनी बांधकाम परवानग्या जलद गतीने व कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी पाषाण येथे स्वतंत्र व्यवस्था सुरू केली. यामागे
झगडे यांचे दूरदृष्टीपूर्वक
नियोजन होते. मात्र, त्यांच्या बदलीमुळे या कामांना खिळ बसण्याची भीती
व्यक्त होत आहे. झगडे यांच्या बदलीचे वृत्त आल्यावर सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत आणि बांधकाम व्यावसाईकांपासून या परिसरातील राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत सर्व घटकांतून संताप व्यक्त
होत आहे.
झगडे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही धडाकेबाज काम केले होते. या वेळीही त्यांच्या बदलीनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.
(प्रतिनिधी)

शिवाजनगर- हिंजवडी मेट्रोचे स्वप्न!
- पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर उपाययोजना करतानाच आयटी सिटीचे स्वरुपच बदलून टाकणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रकल्पाला महेश झगडे यांनी मूर्त स्वरुप दिले. यासाठी सूक्ष्म सर्वेक्षण करून अहवालही केला. संपूर्ण इलेव्हेटेड असणाऱ्या या कामासाठी शासनाच्या मदतीची प्रतिक्षा न करतान निधीचे स्वतंत्र स्त्रोत्र उभे करण्याची योजना झगडे यांनी आखली होती. त्यांची बदली झाल्याने आता या प्रकल्पाचे काय होणार हा प्रश्न आहे.
- पीएमआरडीऐच्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी झगडे यांनी खास पथके तयार केली. मात्र, त्याचबरोबर बांधकाम परवान्याची प्रक्रियाही सुलभ आणि वेगवान केली. त्यामुळे या भागाचा नव्याने विकास होऊ लागला होता. तसेच पीएमआरडीए मार्फत होणाऱ्या रिंगरोडमुळे वाहतुकीचा प्रश्नही सुटणार आहे.

Web Title: Disgruntled Mahesh Jagde, who shaped the PMRD, was dissatisfied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.