महाळुंगे पडवळ मध्ये निर्जंतुकीकरण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:45+5:302021-05-01T04:10:45+5:30
जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असताना आता ग्रामीण भागातही अनेक रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रामीण भागात अनेकदा उपाययोजना होताना दिसत ...
जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असताना आता ग्रामीण भागातही अनेक रुग्ण आढळून आल्यामुळे ग्रामीण भागात अनेकदा उपाययोजना होताना दिसत आहे. महाळुंगे, पडवळ व परीसरात गेली ३-४ दिवस हुतात्मा बाबु गेणु युवा प्रतिष्ठान व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोडीयम हायपो क्लोराईडची फवारणी व परिसर निर्जंतुकीकरण ट्रॅक्टरच्याद्वारे करण्यात आले.
सिनेअभिनेते रवि काळे व कौस्तुभ थोरात यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिला. कमलताई नाथा पडवळ यांनी लागणारे सर्व डीझेल आपल्या पंपावरुन उपलब्ध करून दिले. फवारणी करण्यासाठी गेली चार दिवस हुतात्मा बाबु गेणु युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, संदीप पडवळ, प्रदीप डोके, सचिन चासकर, भरत पडवळ, सतीष पडवळ, सुधीर एटमे, आनंद शिशुपाल, खंडू आवटे, संदीप गुंडाळ, सुनील सैद आदी कार्यकर्ते गावातील विविध ठिकाणी फवारणी करत होते.
--