बायोमेडिकल कच-याची विल्हेवाट, अज्ञात रुग्णालयावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 02:54 AM2018-03-05T02:54:59+5:302018-03-05T02:54:59+5:30
अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता.
सांगवी - अखेर बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मानवीजीवनाला हानिकारक असणारा बायोमेडिकल वेस्टचा कचरा बारामती फलटण रस्त्यावर टाकून देण्यात आला होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेत बारामती फलटण रस्त्याच्या कडेला टाकण्यात
आलेला बायोमेडिकल वेस्टच्या कचयार्ची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विल्हेवाट लावण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात रूग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºर्यांकडे लोकमतने मानवीजीवनाला घातक असणारा बायोमेडिकल वेस्ट कचयार्ची विल्हेवाट लावण्याबाबत पाठपुरावा केला.यानंतर शनिवारी(दि ३) रविवारी (दि ४ ) दोन दिवस खासगी कंपनीकडून बायोमेडिकल वेस्ट कचरा उचलण्याचे कामकाज चालू होते. यानंतर माळेगाव पोलीस दूरक्षेत्रात शनिवारी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.
यामध्ये चारित फेकून दिलेल्या रुग्णांना वापरलेल्या इंजेक्शनच्या लाखो सुया,बाद औषधांसह बायोमेडिकल वेस्टचा ट्रकभरून कचरा टाकून देण्यात आला होता.खांडज हद्दीत ट्रक भरून साहित्य आढळून आले होते.
यामध्ये रुग्णांना वापरलेल्या इंजेक्शन सुया,रक्त नमुनाच्या छोट्या ट्युबा, सिरेंज, सलाइन बोटल, बन्डेज, आयव्हीसेट, सुचर मिडल, बाद झालेले औषध, अशा मानवीजीवनाला हानिकारक बायोमेडिकल वेस्ट कचरा आढळून आल्यामुळे खळबळ माजली होती. परंतु सर्व कचरा उचलुन नेल्यामुळे ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले.
दोषींवर करणार रीतसर कारवाई
बायोमेडिकल वेस्ट कचरा उचलून खासगी कंपनीने उचलून नेला आहे. तसेच अज्ञात रूग्णालयावर माळेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आमच्या वरील विभागाकडे पंचनामा उद्या पाठवणार आहे. जो कोणी यात दोषी आढळेल त्याच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल. यापुढे असे वर्तणूक करणाऱ्या रूग्णालयावर कड़क कारवाई करण्यात येईल,असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
दोषी रुग्णालयावर कारवाई करू
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अज्ञात रूग्णालयावर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.याबाबत अधिक तपास करून दोषी रूग्णालयावर कारवाई करू, असे पोलीस उपनिरीक्षक सी बी बेरड यांनी सांगितले.