आडसाली उसाच्या तोडी लांबल्या

By admin | Published: December 25, 2015 01:49 AM2015-12-25T01:49:29+5:302015-12-25T01:49:29+5:30

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव व मलठण परिसरातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांअभावी आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत

Disposal of sugarcane | आडसाली उसाच्या तोडी लांबल्या

आडसाली उसाच्या तोडी लांबल्या

Next

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव, खानवटे, वाटलूज, नायगाव व मलठण परिसरातील ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांअभावी आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत. वेळेत या उसाची तोडणी न झाल्यास साखर उतारा घटण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरात कारखान्यांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या वाढविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दौंड तालुक्याचा पूर्व भागात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होत आहे. या पाण्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. त्यामुळे या भागाला उसाचे आगर समजले जाते. या भागाचे अर्थकारणच उसाच्या पिकावर अवलंबून आहे.
राजेगाव गटात राजेगाव, मलठण, खानवटे, वाटलूज व नायगाव या गावांचा समावेश होतो. दर वर्षी या राजेगाव गटात सर्वसाधारणपणे १२५ ते १५० ऊसतोड करणाऱ्या टोळ्या असतात; परंतु या हंगामात फक्त ४० ते ५० एवढ्याच टोळ्या आहेत. राजेगाव परिसरात सध्या भीमा-पाटसच्या ७, बारामती अ‍ॅग्रोच्या ४, दौंड शुगरच्या २७, अंबालिकाच्या ३, कर्मयोगी (इंदापूर)च्या २ टोळ्या अशा एकूण ४३ टोळ्याच कार्यरत आहेत. त्यामुळे मजुरांअभावी १८ महिने झालेल्या आडसाली उसाच्या तोडी लांबल्या आहेत.
राजेगाव परिसरातील गावांना भीमा नदीचा किनारा लाभलेला असल्याने उजनी बॅकवॉटरचा फायदा होतो; त्यामुळे या भागात पाणी भरपूर आहे, असे समजून या भागात सर्वच कारखान्यांनी जाणीवपूर्वक टोळ्या कमी टाकलेल्या आहेत, असे एका कारखाना कामगारांनी सांगितले. परंतु, या गावातील ५० टक्के शेती ही खडकवासला कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे, तसेच या भागात झालेल्या कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका यांचे जलस्रोत आटू लागल्याने पाण्याची पातळी खाली गेल्याने ऊस जळू लागला आहे. सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवड केलेली आहे त्या उसाला आता जवळजवळ १८ महिने होत आले आहेत. त्यातच पाणी कमी पडू लागल्याने ऊस जळू लागल्याने उसाच्या फुकाऱ्या होऊ लागल्या आहेत.

Web Title: Disposal of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.