दोन भागीदारांमधील वाद,ऑफिसमध्ये तोडफोड व आग लावून आत्महत्येचा प्रयत्न; धनकवडीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 12:08 PM2020-12-25T12:08:23+5:302020-12-25T12:08:30+5:30

ईशा ग्रुप संस्थेच्या एका माजी संचालकाने आर्थिक वादातून ऑफिसमध्ये घुसून ऑफिसची तोडफोड करत आग लावून दिली.

Dispute between two partners, attempted suicide by vandalizing office and setting fire; Incidents in Dhankawadi | दोन भागीदारांमधील वाद,ऑफिसमध्ये तोडफोड व आग लावून आत्महत्येचा प्रयत्न; धनकवडीतील घटना 

दोन भागीदारांमधील वाद,ऑफिसमध्ये तोडफोड व आग लावून आत्महत्येचा प्रयत्न; धनकवडीतील घटना 

Next

धनकवडी : पुणे शहरातील बड्या भागीदारीत असलेल्या ईशा ग्रुप संस्थेच्या एका माजी संचालकाने आर्थिक वादातून ऑफिसमध्ये घुसून ऑफिसची तोडफोड करत आग लावून दिली. तर स्वतः ऑफिसमध्ये आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. धनकवडी भागात हा प्रकार घडला असून दोन बिल्डरांमध्ये झालेल्या वादाने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भरत नागोरी (वय ६१, रा.धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हसमुख बाबूलाल जैन, राहणार, गुलटेकडी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी आहेत. त्यांचे शंकर महाराज मठाशेजारी ऑफिस आहे. दरम्यान २००६ मध्ये आरोपी जैन, फिर्यादी व इतरांनी ईशा ग्रुप नावाने भागीदारीत संस्था स्थापन केली होती. त्यात फिर्यादी नागोरी, जैन व स्वर्णसिंग सोहेल हे २०१४ पर्यंत संचालक होते. त्यानंतर जैन याने ईशा संस्थेच्या अंतर्गत असलेल्या ईशा स्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीचा राजीनामा दिला होता. मात्र यानंतर या कंपनीच्या भागीदारामध्ये न्यायालयात अनेक दावे सुरू आहेत.

तर फिर्यादी व जैन यांच्यात आर्थिक व इतर गोष्टीसाठी वाद सुरू आहेत. गुरुवारी (दि २४डिसेंबर) दुपारी जैन हा फिर्यादी यांच्या धनकवडी येथील ऑफिसमध्ये गेला. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत ऑफिसमधून बाहेर काढले व आतून ऑफिस लावून घेतले. तसेच ऑफिसची तोडफोड केली. त्यानंतर त्याला आग लावून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाहणीकरून गुन्हा दाखल केला आहे. यात २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रार भरत मिठालाल नागोरी राहणार धनकवडी दिली आहे. 

Web Title: Dispute between two partners, attempted suicide by vandalizing office and setting fire; Incidents in Dhankawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.